🟢 श्री गजानन जाधव यांचा महत्वाचा कृषी सल्ला 🟢
🌱सोयाबीन बद्दल माहिती🌱
या आठवड्यात काही जागी चांगला, कुठे मध्यम व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याने, पाऊस पडल्यास सोयाबीनचे नियोजन कसे करावे?
👉 हलकी जमीन व कोरडवाहू असलेल्या बहुतांश ठिकाणी सोयाबीन सुकले आहे किंवा पिवळे पडले असल्याने, अशा ठिकाणी आता काही फारसा खर्च करणे योग्य नाही. फक्त अशा ठिकाणी सोयाबीनवर अळींचा प्रादुर्भाव असल्यास व सोयाबीन हिरवे असल्यास 'व्हिटारा प्लस' किंवा 'सिंजो' हे अळीनाशक फवारावे व त्यासोबतच १३:०:४५ या विद्राव्य खताचा वापर करू शकता.
👉 भारी जमिनीतील किंवा सिंचन केलेल्या सोयाबीनमध्ये पाऊस पडल्यानंतर थोडा खर्च करण्यास हरकत नाही. अशा ठिकाणी अळीनाशक 'व्हिटारा प्लस' किंवा 'सिंजो' यासोबत एक बुरशीनाशक 'नॅझो सुपर' किंवा 'विसल्फ' अधिक दाणा भरण्यासाठी १३:०:४५ व 'भरारी'चा फवारणीत वापर करू शकता.
👉 या वर्षाच्या आपल्या प्रमुख शिफारसी व त्यांचा परिणाम:
✅ पहिली शिफारस: आम्ही जिल्ह्यानुसार वाणांची निवड सांगितली होती. शिफारसित वाणांची त्या-त्या जिल्ह्यात लागवड केल्यामुळे ते शेतकरी त्या-त्या वाणांबद्दल समाधानी आहेत. पावसाच्या खंडामुळे होणारे नुकसान सोडल्यास, त्या वाणांचे उत्तम प्रदर्शन त्या-त्या जिल्ह्यात झाले आहे.
✅ यावर्षी पावसाचे मोठे खंड व सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने, उताराला आडवी पेरणी किंवा बेड किंवा बीबीएफ (BBF) पद्धतीचा वापर करण्याची शिफारस केली होती. ज्यांनी या पद्धतीने पेरणी केली, त्यांच्या सोयाबीनने इतरांच्या तुलनेत बऱ्यापैकी ताण सहन केला आहे.
✅ पावसाच्या खंडामुळे खोडकीड व चक्रभुंग्याचा धोका वाढेल, त्यासाठी प्रतिबंधात्मक बीजप्रक्रिया व पेरणीनंतर १५-२० दिवसाला 'रेज' किंवा 'रावडी'चा फवारा शिफारस केली होती. ज्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या, त्यांच्या शेतात खोडकीड व चक्रभुंगा कमी आहे.
👉 या सर्व बाबींचे आपण बारकाईने निरीक्षण करून, पुढच्या वर्षासाठी याचा बोध घ्यावा.
🌱कापसाबद्दल माहिती🌱
पावसाचा अंदाज असल्याने, पाऊस पडण्यापूर्वी व पडल्यानंतर काय उपाय करावेत?
👉 पाऊस पडण्यापूर्वी: सर्वप्रथम ज्या कापसाला पाते भरपूर आहेत, मात्र पाण्याचा तान बसला, त्याला पाऊस पडण्यापूर्वी पातेगळ कमी व्हावी यासाठी प्लॅनोफिक्स ५ मिली + युरिया १०० ग्रॅम फवारावे. यासोबत किडीनुसार, फुलकिडा जास्त असल्यास सरेंडर किंवा पांढरी माशी जास्त असल्यास ओडाची एक्स्ट्रा किंवा दोन्ही किडी जास्त असल्यास सरेंडर किंवा तपूस + ओडाची एक्स्ट्रा हे दोन्ही फवारू शकता. मात्र ही प्लॅनोफिक्सची फवारणी पाऊस पडण्याच्या आधी करणे जास्त फायद्याचे असते.
👉 पाऊस पडल्यानंतर खत व्यवस्थापन: ज्या ठिकाणी पावसाच्या तानामुळे खतांची मात्रा दिली नसेल, अशा ठिकाणी चांगला पाऊस पडल्यास खतांची मात्रा द्यावी. त्यामध्ये शक्यतो २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ + पोटॅशचा वापर करावा.
👉 मध्यम पाऊस पडल्यास: याच खतांची आळवणी (Drenching) करू शकता. किंवा जिवाणू खते जसे NPK Boost DX वाढीच्या अवस्थेत, किंवा फूल-पाते असतानी P-Boost DX + K-Boost DX प्रत्येकी अर्धा किलोची आळवणी केल्यास त्वरित परिणाम दिसून कमी खर्चात व्यवस्थापन होईल.
👉 नवीन पात्यांसाठी: पाऊस पडल्यानंतर पातेगळ झाल्यास, जमिनीत ओल व अन्नद्रव्य असताना नवीन पाते काढण्यासाठी झेप १५ मिली प्रति पंप फवारणीत वापर करावा.
👉 झाडे सुकल्यास उपाय: काही जागी पाऊस पडल्यानंतर शॉक लागून काही झाडे सुकू शकतात, त्यासाठी काही करण्याची आवश्यकता फारशी नाही. फक्त अशा झाडांच्या मुळाशी १९:१९:१९ + रायझरची आळवणी करावी.
👉 पाण्याचा तान नसलेल्या कापसासाठी: सिंचन व्यवस्था किंवा पाण्याचा तान नसलेल्या कापसावर फवारणीमध्ये फुलकिडा जास्त असल्यास सरेंडर, नॉव्हेक्ट किंवा तपूस पांढरी माशी जास्त असल्यास ओडाची एक्स्ट्रा दोन्ही असल्यास दोन्ही कीटकनाशके घ्यावीत. यासोबत कमी वाढ असल्यास टॉप-अप किंवा योग्य वाढ असल्यास नवीन पात्यांसाठी झेप या संजीवकाचा वापर करावा.
👉 ठिबकवरील कापसासाठी: ठिबक वरील कापसाला गरजेनुसार पाते-फुलांच्या अवस्थेत १२:६१:० (२ वेळा), त्यानंतर ०:५२:३४ (२ ते ३ वेळा), त्यानंतर बोंड लागल्यानंतर १३:०:४५ (२ ते ३ वेळेस) व बोंड पकव होताना Big B (२ वेळेस) अशी विद्राव्य खतांची आळवणी करता येईल. किंवा स्वस्तात २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ + पांढरा पोटॅश सुद्धा वापरता येईल.
👉 रसशोषक किडींचे नियंत्रण: पाऊस ज्या ठिकाणी जोराचा पडेल, तिथली रसशोषक कीड बऱ्यापैकी कमी होईल. अशा जागी निरीक्षण करूनच फवारणीचा निर्णय घ्यावा.
👉 डवरणी: शेवटची डवरणी असल्यास, डवऱ्याला दोरी बांधून मध्ये डवरणी करावी ज्यामुळे तिथे मातीची भर पडेल. व अशा तासात दोरी सोडून पुन्हा डवरणी करून माती मोकळी करून घ्यावी.