Marathi Business ideas - मराठी बिझनेस Telegram channel photo

Marathi Business ideas - मराठी बिझनेस

नवनवीन बिझनेस आयडिया आणि बिझनेस प्लॅन्स 🔰 ✅ मार्केटिंग स्ट्रॅटेजी ✅ बिझनेस मोटिवेशन ✅ उद्योजकता शिक्षण ✅ मोफत मार्गदर्शन Powered By - @MarathiMoney

2.6k

Last views

४.३k (4,258 subscribers)
सदस्य
—
Rating
13
Total Posts
Oct 12, 2026, 5:27 AM
अपडेट केले
Oct 10, 2025
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel NameMarathi Business ideas - मराठी बिझनेस
Username@marathi_business_ideas
Categoryबिझनेस न्यूज
Languageमराठी
Countryभारत
सदस्य4,258
Channel TypePublic Channel
Created१० ऑक्टो, २०२५
Last Updated१२ ऑक्टो, २०२६ • १० दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#327648-808
भाषा रँकिंग
#197-1
श्रेणी रँकिंग
#5251-18

सहभागींची वाढ

एकूण: 4.3K30 Days growth: -681.6%
09/1209/1709/2209/2710/0210/0710/11
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
12:09:20264,326
13:09:20264,326
14:09:20264,307
15:09:20264,307
16:09:20264,307
17:09:20264,307
18:09:20264,307
19:09:20264,307
20:09:20264,307
21:09:20264,307
22:09:20264,307
23:09:20264,307
24:09:20264,293
25:09:20264,293
26:09:20264,293
27:09:20264,293
28:09:20264,293
29:09:20264,293
30:09:20264,293
01:10:20264,293
02:10:20264,293
03:10:20264,293
04:10:20264,293
05:10:20264,293
06:10:20264,293
07:10:20264,293
08:10:20264,293
09:10:20264,293
10:10:20264,293
11:10:20264,258
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 16:03:20264,743
Week of 23:03:20264,715
Week of 30:03:20264,698
Week of 06:04:20264,682
Week of 13:04:20264,646
Week of 20:04:20264,634
Week of 27:04:20264,634
Week of 04:05:20264,603
Week of 11:05:20264,603
Week of 18:05:20264,603
Week of 25:05:20264,557
Week of 01:06:20264,557
Week of 08:06:20264,529
Week of 15:06:20264,529
Week of 22:06:20264,505
Week of 29:06:20264,505
Week of 06:07:20264,505
Week of 13:07:20264,469
Week of 20:07:20264,461
Week of 27:07:20264,446
Week of 03:08:20264,446
Week of 10:08:20264,396
Week of 17:08:20264,396
Week of 24:08:20264,367
Week of 31:08:20264,326
Week of 07:09:20264,326
Week of 14:09:20264,307
Week of 21:09:20264,293
Week of 28:09:20264,293
Week of 05:10:20264,258
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
March 20264,715
April 20264,634
May 20264,557
June 20264,505
July 20264,446
August 20264,367
September 20264,293
October 20264,258
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
20264,258

नवीनतम पोस्ट्स

Marathi Business ideas - मराठी बिझनेस logo
Marathi Business ideas - मराठी बिझनेस

१३ सप्टें, २०२६, १९:४१

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्यूनर घेतल्यापासून आपण करत असलेल्या नोकरीचा आणि आपण घेतलेल्या शिक्षणाचा काहीही फायदा नाही असं सांगणारे खूप सारे रिल्स येत आहेत.. पण इथे विषय शिक्षणाचा नाही..

एखाद्याने केलेली कमाई ही डायरेक्ट शिक्षणाशी जोडणं किंवा नोकरी जोडणे चुकीचा आहे.. कसं ते सांगतो..

१.पहिला मुद्दा आहे व्यवसाय vs नोकरी
व्यवसाय भलेही मग तो रस्त्याच्या कडेला टाकलेल्या हॉटेलचा असो पण या ठिकाणी होणारा प्रॉफिट हा डायरेक्ट मालकाचा असतो.. याच्या अगदी विरोधात नोकरी करणाऱ्याला महिन्याला फिक्स पगार मिळतो आणि कंपनीतून होणाऱ्या नफ्यातील मिळालाच तर फक्त बोनस मिळतो तेही वर्षातून एकदाच..

२. दुसरा मुद्दा आहे स्केल आणि डिमांडचा
महाराष्ट्र असो किंवा इतर कुठेही जर का उत्तम दर्जाच खायला मिळत असेल तर या ठिकाणी गर्दी होणार, डेली कॅश फ्लो हा असणारच.. त्यामुळे नोकरी करणारा माणूस इथे स्पर्धेत कुठेच बसत नाही..

३. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे रिस्क आणि रिवॉर्ड
कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागते, भांडवल मोठ लागतं, माणसं सांभाळावे लागतात तेव्हा कुठे जाऊन डायरेक्ट फायदा होतो.

नोकरी करणाऱ्याला आर्थिक धोका नको असतो त्याच्यामुळे आहे त्या फिक्स मासिक उत्पन्नामध्ये ऍडजस्ट कराव लागतं..

४. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संधी आणि माइंडसेटचा. एखादा व्यक्ती शिक्षणाने कमी असू शकतो पण त्याच्याकडे व्यवसाय करण्याचं स्किल हे निश्चितपणे असू शकतं.
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला त्याचं प्रॉडक्ट उत्तम प्रतीने विकता येते, ते एक नॅचरल मार्केटर आहेत.. इनफॅक्ट आज हॉटेल बंद आहे याचं सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलेलं आहे.. आणि त्याचे सुद्धा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले..

याच्या दुसऱ्या बाजूला नोकरी करणारा शिक्षित नोकरदार याला निश्चित अशी नोकरीची हमी हवी असते.. आणि हीच हमी त्याचं उत्पन्न किती मिळवू शकतो हे पोटेन्शिअल दाबून ठेवते..

त्यामुळे पूर्णपणे शिक्षणाला दोष देण्यामध्ये किंवा आपल्या नोकरीला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही..

शिक्षण हे एक टूल आहे जे तुम्हाला स्किल, अवेअरनेस आणि नॉलेज देत.. याचा वापर संपत्ती निर्माण करण्यात कसा करायचा हे तुमच्या धोका पत्करण्यावरती, तुम्ही संधी कशी हेरता याच्यावरती आणि तुमच्या माईंडसेट वरती अवलंबून असतं..

त्यामुळे शिक्षणाला आणि नोकरीला उगाच दोष देऊ नका.. असेल हिम्मत तर तुम्ही सुद्धा धोका पत्करून व्यवसाय करायला हरकत नाही.. त्यांचं मनमोकळेपणाने अभिनंदन करा.. त्यांच्याकडून आपल्याला शिकायला खूपकाही आहे..

गमवायला काही नसेल तर कमवायला खूप काही आहे हे लक्षात घ्या..

© अरुणराज जाधव ( बोल भिडू )
5,0300030
Marathi Business ideas - मराठी बिझनेस logo
Marathi Business ideas - मराठी बिझनेस

१३ सप्टें, २०२६, १९:४१

मायक्रोसॉफ्टने नुकताच सहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. त्यामध्ये नोकरी गमावलेल्या एका कर्मचाऱ्याने एक सोशल पोस्ट केली. मला कामावरून काढण्यात येईल याची पुसटशी शंका देखील कधी आली नाही. जी नोकरी माझी ओळख बनली होती, ज्या गोष्टीचा मला अभिमान होता तो किती पोकळ होता अशा अर्थाची ती पोस्ट होती. यावरून माझी गोष्ट आठवली ती तुमच्यासोबत शेअर करतोय.

2006-07 चा काळ. नोकरी होती, काम आवडत होतं, पगार वेळेवर मिळत होता. प्रमोशन मिळत होतं. जीवन सुरळीत चाललं होतं. त्या वेळेला वाटायचं – हीच आयुष्याची योग्य दिशा. आता हेच कायम चालेल.
पण मग 2008 आलं. आर्थिक मंदी आली. ऑफिसमधील अनेक मित्रांची नोकरी गेली. ऑफिस ग्रुपमधील दोन खास मित्रांना नवीन नोकरी शोधण्यासाठी "तीन महिन्यांची मुदत" देण्यात आली. माझी नोकरी राहिली, पण मनात एक विचार खोलवर रुजला – "आपल्यावरही ही वेळ येऊ शकली असती .आपण जिथे सुरक्षित आहोत असं वाटतं, तिथेही धोका असतो."

या घटनेच्या २ वर्षे आधीच एका मित्राने स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून नोकरी सोडली होती. त्याचा काही जम बसत नव्हता. अनेक अडचणी येत होत्या. किमान २ -३ वेळा तरी त्याला मी पैशांची मदत केली होती. प्रत्येक वेळी पैसे देताना मी त्याला सल्ला द्यायचो की नोकरी कर, स्थिर उत्पन्न मिळेल. पैसा उभा कर आणि नंतर व्यवसायात उतर.

दोन वर्षानंतर जेव्हा सगळ्यांच्या नोकरीत "अस्थिरता" आली होती तेव्हा माझया मित्राचा व्यवसाय मात्र जोरात चालू होता. त्यावेळी लक्षात आलं की "अनिश्चितता" येणारच नाही असा जो विचार करतो तो मूर्ख...."अनिश्चितता" येणार हे माहित असूनही आपण त्यापासून सुरक्षित आहोत असा विचार करतो तो "महामूर्ख" आणि ""अनिश्चिततेच्या" धक्क्यांना जो मुद्दामहून सामोरा जातो, तोच खरा "शहाणा" माणूस !

२ ० ० ८ साली ही ठिणगी पडली. आणि मी आपली नोकरी अचानक गेली तर काय ? याचा विचार करू लागलो. काहीतरी उत्पन्नाचे साधन असावे यादृष्टीने पार्ट टाइम काही करता येते का याचा शोध चालू केला. सुदैवाने (!) २ ० ० ८ मध्ये मार्केट कोसळले होते त्यामुळे "ट्रेडिंग" करून पैसे कमावण्याचा विचारही मनाला शिवला नाही !
गुगल वर सर्च केले तेव्हा "पार्ट टाइम ऑनलाईन कमाईचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे "ब्लॉगिंग" करून पैसे कमावणे" हाच उपाय बहुतांशी सगळीकडे दिसत होता.

तिथून माझी ब्लॉगिंगची सुरुवात झाली. तेव्हा ब्लॉगलिखाण भारतात तितकेसे रुजले नव्हते. माझं इंग्रजी लिखाण "चार ओळींची ईमेल" लिहिण्यापुरतेच मर्यादित होते. (तेव्हा chatgpt नव्हतं ना !) त्यामुळे मराठीत ब्लॉग सुरु केला. मात्र त्यावेळी मराठी ब्लॉग्जसाठी adsense approval मिळत नसे आणि त्यामुळे पैसे कमावण्याचा मार्ग माझ्यासाठी बंद होता. माझ्यातला इंजिनीअर मग जागा झाला. adsense approval साठी अनेक जुगाड करून बघायला लागलो.

इंटरनेटवरून अनेक ब्लॉगपोस्ट्स एकत्र करून मी इंग्लिश पोस्ट्स बनवल्या. वेगवेगळ्या ब्लॉगपोस्ट्स मधून एक एक पॅराग्राफ घेऊन त्यातून वेगळीच ब्लॉगपोस्ट तयार करायचो. या इंग्लिश पोस्ट करायचो आणि त्यासोबत मराठी पोस्ट स्वतः लिहायचो. मराठी पोस्ट साठी वाचक यायचे आणि इंग्लिश पोस्ट मुळे ads दिसायच्या ! २ इंग्लिश पोस्ट्स मागे १ मराठी पोस्ट असे प्रमाण असायचे. काही दिवसांनी गुगलने ही चोरी पकडून अकाउंट बॅन केले.
नंतर मी पुन्हा ब्लॉग सुरु केला . यावेळी मराठी पोस्ट्स लिहायचो आणि त्याखाली लांबलचक इंग्लिश कन्टेन्ट लिहायचो. पण फॉन्टचा रंग सफेद ठेवायचो. त्यामुळे वाचकांना इंग्रजी कन्टेन्ट दिसायचंच नाही. आणि गुगल बॉट्सचे पण हा इंग्रजी ब्लॉग आहे असे समाधान व्हायचे. तर असे अनेक जुगाड करत गेलो...ते आजपर्यंत करतच आहे !

आठ महिन्यांनंतर पहिला १ ० ० डॉलरचा चेक आला तेव्हा मला जो आनंद झाला तो एवढ्या वर्षांच्या पगारामध्ये कधीही मिळाला नव्हता. ब्लॉगिंगमध्येच न थांबता मी वेब डिझाईन, ईकॉमर्स, युट्युब, कन्टेन्ट रायटिंग असे अनेक प्रयोग करत होतो. पुढे यासर्वांतून मिळणारे उत्पन्न वाढत गेले आणि २ ० १ २ -१ ३ च्या आसपास मी माझ्या पगाराच्या ६ ० % उत्पन्न ऑनलाईन माध्यमातून कमवत होतो. २ ० १ ५ ला माझी "स्थिर" नोकरी सोडली आणि "अनिश्चिततेच्या" मार्गाचा स्वीकार केला.

उत्पन्न अनिश्चित, कामाची दिशा अज्ञात… पण मनात एक गोष्ट नक्की होती – “हे संकट नाही, ही संधी आहे."
आज माझा कुणी बॉस नाही. मी माझं काम स्वतः ठरवतो. कधी काम करायचं ? किती काम करायचं ? कुणाबरोबर काम करायचं ? मुख्य म्हणजे "का" करायचं यावर माझं नियंत्रण आहे. आणि महत्वाचं म्हणजे, मी आता अनिश्चिततेला घाबरत नाही. तीच माझी ताकद झाली आहे.

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
6,0700033
Marathi Business ideas - मराठी बिझनेस logo
Marathi Business ideas - मराठी बिझनेस

१३ सप्टें, २०२६, १९:४१

#businesspost

Time is money, वेळ म्हणजे धन असा याचा केवळ अर्थ नसून 'वेळ साधणे' असा याचा खरा अर्थ आहे. यालाच 'मौके पे चौका' असे म्हणतात.

अन अशा संधी फारशा येत नसतात, आल्या की करेक्ट कार्यक्रम करायचा असतो. अन्यथा वेगाने प्रगती होत नसते.

महाराष्ट्रातील अनेक व्यवसायीक जेव्हा लोकांचे फक्त आधार कार्ड काढत होते, तेव्हा आम्ही काय करत होतो, हे सांगतो.

कोणताही बिझनेस छोटा नसतो, फक्त त्याचा गुणाकार करता आला पाहिजे. बेरीज करत करत गाडी पुढे सरकायला बराच वेळ जातो, त्यापेक्षा गुणाकार कधीही उत्तम.

मी स्वतः ई-सेवा केंद्र चालवणारा व्यक्ती म्हणूनच व्यवसायाला सुरुवात केली होती. मात्र त्या कामात हुशार होऊन 2016 नंतर महाराष्ट्रातील अनेक इ-सेवा केंद्रांच्या चालकांना मोफत trainings दिल्या. त्यामुळे त्यांच्याशी माझा संपर्क आला. दिलेल्या training मुळे त्यांचा बिझनेस वाढला. माझ्याबद्दल त्यांना विश्वास निर्माण झाला. माझं नेटवर्क वाढतच राहिलं. काही अडचणी आल्या तर ते मला विश्वासाने सल्ला विचारत असत.

सुरुवातीपासून माझा कल बिझनेसच्या गुणकाराकडे राहिलेला आहे. तसे पाहिले तर माझें बिझनेस मॉडेल अतिशय छोटेसे आहे. यातून इतर लोक दिवसाला जास्तीत जास्त 1000-1500 रुपये मिळवू शकतात.

मात्र मी काय केले, मी आधारच्या चार मशीन्स घेतल्या, त्या सतत नगरसेवकांकडे शिबिरासाठी busy ठेवल्या. सात माणसं कामाला होती आणि मी एक.

चार मशीन्स सांभाळायला चार मुलं होती.

तसेच आधार मशीन कुणाला विकता येईल का ते पाहिले, त्यासाठी गुजरातमधील एका कंपनीला contact केला, ती आधारच्या भारतभर असलेल्या मोजक्याच service provider पैकी एक होती. त्यांच्याकडून महाराष्ट्र-मुंबईसाठी vendor ship access मिळवला. महाराष्ट्रातील अनेकांना आधारच्या trainings दिल्या. त्यांना operator/supervisor चे license मिळवून दिले. ह्या लायसन्ससाठी रितसर exam होते, त्याच्या trainings घेतल्या. परीक्षेला बसवले. त्यातली consultancy करून revenue मिळवला.

शिवाय operator तयार केल्यावर त्याला त्याच्या गावात/शहरात आधार सेंटर टाकायचे असे, त्यासाठी त्यांना पूर्ण setup लावून दिला. त्यातून revenue जमवला.

त्यासाठी लागणारे 10 finger print device आणि iris scanner बंगलोरमधील कंपनीकडून मिळवले. ते आधार centre वाल्यांना विकून r
Revenue Generation केले. ह्या दोन device ची किंमत 60,000 रुपये आहे. शिवाय Installation वगैरेच्या कामातून पैसा मिळत असे.

आधार Enrollment मशीनला GPS Tracker असते. ते Gps Tracker इंडियामध्ये 3000 रुपयांना मिळते, तेच China मध्ये 1200 रुपयांना मिळते. बाहेर देशातून वस्तू कशा मागवायच्या, म्हणजे Import करायच्या, पाठवलेले पैशे बुडणार तर नाही ना, अशी धास्ती होतीच, याआधी आपल्या खानदानीत असले उद्योग कोणी केले नव्हते. तरी त्याबद्दल थोडासा अभ्यास केला. अभ्यासातून कॉन्फिडन्स आल्यावर Paypal वरून Payment करून भरपूर GPS Trackers मागवली अन इथे 2500 रुपयांना विकली. इंडियात 3000 रुपयांना मिळणारे Device आम्ही 2500 रुपयांना देऊ शकल्याने महाराष्ट्रभरातील भरपूर ग्राहकांनी मागणी नोंदवली.

असे एकाच Service मधून वेगवेगळ्या प्रकारे आत शिरून धंदा केला.

अशा आम्ही अनेक सेवा देत असू, आताही देतो. सगळ्या Services अशा पद्धतीने Explore करत असतो.

मौके पे असे अनेक चौके मारायचे संधी आली, तेव्हा फुल्ल धोनी स्टाईलने खेळलो, आणि एरवीच्या काळात राहुल द्रविडसारखे एकेक रन काढत पीचवर टिकून राहण्याकडे कल असतो.

असेच Leave and License Service बद्दल, आम्ही फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये मध्ये सेवा देत नाही. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक ह्या पाच शहरात काम करत होतो. अन त्यातून अधिकचा Revenue मिळवत होतो.

ह्या कामात दिवसाला दोन agreement चे ग्राहक मिळवले तरी त्या व्यवसायिक व्यक्तीला उत्तम व्यवसायिक मानले जाते, आम्ही त्याच ठिकाणी दिवसाला 12-15 Rental agreements सहज करत असतो.

आता आम्ही आमचा आवाका, नेटवर्क वाढवत वाढवत हीच Leave and License registration ची सेवा 'जगभर' खात्रीशीररित्या doorstep देतो आहोत. अट एकच, ज्या जागेचा भाडेकरार करायचा आहे ती प्रॉपर्टी महाराष्ट्र राज्यातील पाहिजे.

Backward Integration, Forward Integration ही नक्की काय भानगड असते, हे मला अजिबात माहिती नव्हते. मात्र तिचा अवलंब मी आधीपासूनच करत आलो आहे.

डोक्याडोक्याने काम केले की यश मिळतेच. संधी ओळखणे महत्त्वाचे असते, असे मला वाटते. आपण जे करत असतो, त्यातसुध्दा आणखी खूप साऱ्या संधी असतात, आपल्याला फक्त त्या ओळखता आल्या पाहिजेत.

जर गाईची दुध देण्याची क्षमता पाच लिटर आहे, तर अवघ्या अर्धा लिटरमध्ये खूश का व्हावे!

निलेश अभंग, कल्याण.
12,1000059
Marathi Business ideas - मराठी बिझनेस logo
Marathi Business ideas - मराठी बिझनेस

१३ सप्टें, २०२६, १९:४१

नोकरी करताना अनुभव वाढतो तसा पगार वाढतो. जितक्या जास्त वर्षांचा अनुभव तितका जास्त पगार मिळतो. Experience वाल्या उमेद्वाराला अधिकचा पगार देऊन नोकरीवर घेतले जाते.

असेच व्यवसायात वाढत्या अनुभवाचे खूप सारे फायदे आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कृती केल्यामुळे अनुभवाने काय करायचे नाही ते कळते. अनुभवामुळे आपल्याला व्यक्तींचा फोलपणा लक्षात येतो (ज्यांनी आपल्याला तू व्यवसायात आलास तर कधीही फोन कर, मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन अशी आश्वासने दिलेली असतात) आपणही त्यांच्यावर विसंबून राहतो, मात्र अनुभव घेतल्यानंतर कळते की तो उगाच राजकारणी माणसासारखा खोटी आश्वासने देत होता.

शिवाय कोणत्या प्रकारच्या जाहिराती करायच्या, कोणत्या प्रकारच्या नाही करायच्या, कोणते प्लॅटफॉर्म्स वापरायचे, कोणते वापरायचे नाही, आवश्यक लायसन्स कोणते ते सारे समजते.

कमावलेले पैसे कसे जमवायचे, बचत करायचे, शक्य असल्यास कुवतीनुसार लहानमोठ्या गुंतवणुकी करायच्या. (जे पहिल्यांदा व्यवसाय करताना बहुतांशी व्यवसायिक करीत नाहीत, त्यांना वाटते की आपल्याकडे पैशाचा flow असाच कायम राहणार आहे.)

व्यवसायात येणारी लहान सहान अपयशे, अनिश्चितता, नकार पचवण्याचा सराव झालेला असतो. त्यामुळे हाही अनुभव खूप कामी येतो.

अनावश्यक खर्च कसा टाळायचा, हे अनुभवातूनच कळते. अनुभव नसताना व्यवसायिक अंधाऱ्या वाटेतून चाचपडत चालत असतो, मात्र अनुभवरुपी टॉर्चमुळे अंधारातही वाट स्पष्ट दिसते.

एक छोटेसे उदाहरण देतो, मी जवळजवळ चार वर्षे सत्तर whatsapp groups वर रोज वा दिवसाआड माझ्या व्यवसायाच्या जाहिराती टाकायचो, मात्र कधीच एकसुध्दा प्रतिसाद मिळाला नाही. ह्या अनुभवामुळे मी आता ते करणे पुर्णतः टाळतो. मला असे वाटते की WhatsApp Groups मधील लोक तुम्हाला प्रत्यक्ष ओळखत असतील, तुमच्या अधूनमधून भेटीगाठी होत असतील तरच तुम्हाला ह्या WhatsApp advertisement चा उपयोग होऊ शकतो.(तुमचा अनुभव वेगळा असू शकतो)

अनुभवामुळे सराव होतो, सरावामुळे आपला प्रवास परिपूर्णतेकडे व्हायला सुरुवात होते, त्यामुळे व्यवसायात यशाच्या शक्यताही वाढतात.

नोकरी असो वा व्यवसाय वा जीवन अनुभवाचे खूप मोठे योगदान असते.

- निलेश अभंग, कल्याण

#businesspost
9,6300024
Marathi Business ideas - मराठी बिझनेस logo
Marathi Business ideas - मराठी बिझनेस

१३ सप्टें, २०२६, १९:४१

जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या शहरात एखादा Business Networking Club जॉईन करा, आवर्जून करा.

आपल्याला व्यावसायिकांचा सहवास मिळतो, त्यातून जे केले पाहिजे ते आपण आपल्या व्यवसायात करत नाही आहोत हे कळते. तिथल्या अनेक व्यवसायिक मित्रांकडून व्यवसायाचे मार्गदर्शन मिळते, मुख्य म्हणजे व्यवसाय (ग्राहक) मिळतो. एकमेकांच्या Reference ने ग्राहक मिळत जातात. अनेकांना अनेक Service Providers तिथे भेटतात. अनेक Service Providers ना ग्राहक तिथे भेटतात. हाती घेतलेले काम जबाबदारीने पार पाडावे लागते. अन्यथा समूहात नाव खराब होऊ लागते, ज्याचा थेट परिणाम इतर सदस्यांकडून मिळणाऱ्या बिजनेसवर होतो.

तिथे आणखी प्रगती करु इच्छिणारे लोक असतात, त्यांच्याकडून ऊर्जा मिळते, आपण कशाबाबतीत मागे आहोत ते समजते. आपल्या व्यवसायात आणखी क्राफ्ट कसा आणता येईल, याचा आपण इतरांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धती पाहून विचार करू लागतो.

दर आठवड्याला, पंधरा दिवसाला तीस-चाळीस Business Owners ची प्रत्यक्ष भेट होते, अनेक विषयांवर चर्चा करता येते, सल्ला घेता येतो.

शाळा कॉलेजात मुले-मुली एकत्र शिकतात, ते एकमेकांपासून खूप काही शिकत असतात, जे त्यांचे शिक्षकही शिकवत नाहीत वा शिकवू शकत नाहीत, अशा अनेक आवश्यक बाबी ते शिकत असतात. शिवाय लोकांमध्ये (समाजात ) कसे वावरायचे, कसे बोलायचे, काय बोलायचे, काय नाही बोलायचे, कसे वागायचे याचे सारे शिक्षण विदयार्थ्यांना शाळेत, कॉलेजात मिळते, जे Home schooling मध्ये मिळणे शक्यच नाही, (ही Home schooling ची सर्वात कमजोर बाजू आहे) विद्यार्थी निरीक्षणांतून शिकत असतात.

तसेच व्यवसायिकही त्याच्या भोवती व्यवसाय करणारे लोक असतील तर त्यांच्याकडून कळत नकळत खूप काही शिकू शकतो. म्हणून मला असे Networking Platforms खूप महत्त्वाचे वाटतात.

आता माणसं आले तिथे राजकारण हे असणारच आहे. हेवेदावे, रुसणे खुपणे, एखाद्याची नालस्ती करणे हे आलेच. मी हा दोष त्या platform ला देत नाही, माणसं आले की हे सारे उद्योग होणारच. आपण ह्या पृथ्वीवरचा थोर जीव आहोत, ज्याचे प्रमाण आपण कुठेही गेलो की द्यायला विसरत नाही.

तुमचे साऱ्या चाळीस जणांशी मैत्र होणार नाही, मात्र एक-दोघे असे असतील की ज्यांना तुम्ही काही काळाने जिवाभावाचे मित्र म्हणू शकता, कारण आपल्या स्वभावाशी साधर्म्य असणारे लोक कुठल्याही समूहात कमीच असतात, जो तो त्याच्या स्वभावानुसार मित्रमंडळी निवडत असतो.

तुम्हाला प्रगती करावयाची असल्यास तुमचे सर्कल बदलणे, आणखी अद्ययावत सर्कलमध्ये प्रवेश करणे फार गरजेचे असते, जे तुम्हाला अशा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्समुळे सहज शक्य होते.

मात्र इथे मिळणाऱ्या मोठेपणात वाहवत जाऊ नये. जे वाहवत जातात त्यांचे नुकसान होतेच होते.

थोडक्यात, असे प्लॅटफॉर्म जॉईन करणे हा तसा नफ्याचा सौदा आहे.

- निलेश अभंग, कल्याण

#businesspost
7,2200023

Showing 13 of 13 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

Marathi Business ideas - मराठी बिझनेस टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

Marathi Business ideas - मराठी बिझनेस (@marathi_business_ideas) हा tgdio वर बिझनेस न्यूज श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे ४,२५८ सबस्क्राइबर आहेत.

मी Marathi Business ideas - मराठी बिझनेस (@marathi_business_ideas) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @marathi_business_ideas वर मोफत सबस्क्राइब करा.

Marathi Business ideas - मराठी बिझनेस चांगला बिझनेस न्यूज चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी Marathi Business ideas - मराठी बिझनेस ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे ४,२५८ सबस्क्राइबर आहेत. सारख्या बिझनेस न्यूज चॅनेल्सशी तुलना करा.

Marathi Business ideas - मराठी बिझनेस चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @marathi_business_ideas पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.