1/2राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची दिवाळी संकटात जाईल, याची राज्य शासनाला कल्पना आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून राज्य सरकारकडून 5000 रूपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रूपये जमा केले जातील, असे त्यांनी सांगितले.

















