व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) Telegram channel photo

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)

@whitegoldtrustPublic Channel

शेतीविषयी माहिती साठी संपर्क 8888167888

1.4k

Last views

१२.३k (12,333 subscribers)
सदस्य
—
Rating
79
Total Posts
Oct 14, 2026, 8:18 AM
अपडेट केले
Apr 4, 2026
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Nameव्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
Username@whitegoldtrust
Categoryबिझनेस न्यूज
Languageमराठी
Countryभारत
सदस्य12,333
Channel TypePublic Channel
Created४ एप्रि, २०२६
Last Updated१४ ऑक्टो, २०२६ • ७ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#336873-867
भाषा रँकिंग
#207+1
श्रेणी रँकिंग
#5395-24

सहभागींची वाढ

एकूण: 12.3K30 Days growth: -2191.7%
09/1509/2009/2509/3010/0510/1010/14
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
15:09:202612,552
16:09:202612,552
17:09:202612,505
18:09:202612,505
19:09:202612,505
20:09:202612,505
21:09:202612,505
22:09:202612,505
23:09:202612,505
24:09:202612,505
25:09:202612,505
26:09:202612,505
27:09:202612,505
28:09:202612,505
29:09:202612,505
30:09:202612,505
01:10:202612,505
02:10:202612,505
03:10:202612,505
04:10:202612,505
05:10:202612,505
06:10:202612,505
07:10:202612,505
08:10:202612,505
09:10:202612,505
10:10:202612,505
11:10:202612,505
12:10:202612,505
13:10:202612,505
14:10:202612,333
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 30:03:202613,490
Week of 06:04:202613,428
Week of 13:04:202613,428
Week of 20:04:202613,428
Week of 27:04:202613,280
Week of 04:05:202613,280
Week of 11:05:202613,169
Week of 18:05:202613,169
Week of 25:05:202613,169
Week of 01:06:202613,043
Week of 08:06:202613,043
Week of 15:06:202613,043
Week of 22:06:202613,043
Week of 29:06:202612,921
Week of 06:07:202612,921
Week of 13:07:202612,921
Week of 20:07:202612,803
Week of 27:07:202612,803
Week of 03:08:202612,744
Week of 10:08:202612,744
Week of 17:08:202612,667
Week of 24:08:202612,624
Week of 31:08:202612,624
Week of 07:09:202612,552
Week of 14:09:202612,505
Week of 21:09:202612,505
Week of 28:09:202612,505
Week of 05:10:202612,505
Week of 12:10:202612,333
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202613,280
May 202613,169
June 202612,921
July 202612,803
August 202612,624
September 202612,505
October 202612,333
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202612,333

नवीनतम पोस्ट्स

🔴 व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर 🔴
दिनांक: १७ - १० - २०२६

☀️ सुधारित हवामान अंदाज ☀️
या आठवड्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील दोन-चार ठिकाणं जर सोडले आणि तिथे हलका पाऊस जर सोडला तर राज्यामध्ये दिवसभर चालणारा किंवा फायदा होईल असा मोठा पाऊस कुठेही अपेक्षित नाही.

फक्त सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील दोन-चार ठिकाणी मंगळवार, बुधवारी हलका पाऊस पडू शकतो.

इतरत्र मोठ्या पावसाची कुठेही अपेक्षा नाही.
1,400000
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: १२-१०-२०२६

☀️हवामान अंदाज☀️
👉 या आठवड्यात सुद्धा सगळीकडं कोरडं हवामान राहील, मान्सून राज्यातून माघारी गेलेला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे सध्या सरासरीपेक्षा तापमान जास्त आहे. या आठवड्यात सुद्धा मागच्या आठवड्याप्रमाणेच तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहील.

👉 अकोला, अमरावती, जळगाव या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान साधारणतः ३५ ते ३९ अंश राहू शकते. छत्रपती संभाजीनगर व त्या आसपास ३५ अंश व उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमान ३५ ते ३७ अंशा दरम्यान राहील.

👉 या आठवड्यात थंडीत सुद्धा फारशी वाढ अपेक्षित नाही. मात्र पुढे वातावरण बदलून तापमानात थोडी घट व थंडीत थोडी वाढ होऊ शकेल.

👉 काही शेतकरी १८ ऑक्टोबर नंतर पावसाचा अंदाज आहे का असे विचारत आहेत. मात्र सध्या तरी असे काही चित्र फारसे दिसत नाही. काही शक्यता असल्यास १५ ऑक्टोबरला गुरुवारी कळवण्यात येईल.

👉 काही लोक अपप्रचार करून पुढच्या वर्षी सुद्धा अल निनोचा प्रभाव राहून दुष्काळी परिस्थिती राहील असं सांगत आहे. मात्र पुढील वर्षी मान्सून हा सामान्य किंवा सामान्यपेक्षा अधिक पाऊस हा राहू शकतो. कारण अल निनोचा प्रभाव दोन वर्ष सतत राहत नाही. एक वर्ष राहिल्यानंतर दुसऱ्या वर्षी परिस्थिती ही सामान्य किंवा सामान्यपेक्षा चांगली पावसाची राहू शकते.
3,420000
🔴 ठीक 07:00 वाजता,सरांचे "रब्बी पिकांबद्दल महत्वाच्या टिप व हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन"
या महत्त्वाच्या विषयावर लाईव्ह होणार असून सर्वानी लाईव्ह आवर्जून बघावे.🔴

👇🏻

youtube.com/live/7Unp16Lqbd4?si=6VlZZtR4Xw0pHhbY

YouTube

रब्बी पिकांबद्दल महत्वाच्या टिप व हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन

सोमवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " रब्बी पिकांबद्दल महत्वाच्या टिप व हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवानी Live पाहावे…

4,400000
🟢 श्री गजानन जाधव यांचा कृषी सल्ला 🟢

🌱हरभऱ्याबद्दल माहिती🌱

👉 जमिनीत ओलावा असल्यास किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास हरभरा पेरणी लगेच करावी.
👉 सोयाबीनचे शेत कापणी झाल्याबरोबर अगोदर हरभरा पेरणी करावी व कमी ओलावा असल्यास नंतर सिंचन करावे.
👉 हरभरा पेरणी शक्यतो बीबीएफ (BBF) किंवा जोडओळ पद्धतीने करावी.
👉 हरभऱ्याचे सर्वाधिक लागणारे प्रचलित वाण बूस्टर जॅकीची प्राधान्याने निवड करावी. मिळाल्यास बूस्टरचे नवीन संशोधित वाण शुटर हरभरा काही क्षेत्रात पेरावा.
👉 पेरणीपूर्वी हरभरा बियाण्याला ट्रायकोडर्मा ५ ते १० ग्रॅम शक्यतो ट्रायकोबूस्ट DX ची पाण्यात विरघळवून बीजप्रक्रिया आवश्यक करावी, त्यामुळे भविष्यात हरभऱ्याची मर थांबवता येईल.
👉 हरभऱ्याला पेरणीसोबत शक्यतो DAP, १२:३२:१६, १४:३५:१४, ८:२१:२१ किंवा ९:२४:२४ अशा खतांचा वापर करावा.
👉 हरभऱ्याचे एकरी २० ते ३० किलो बियाणे (बियाण्याच्या आकारानुसार) वापरावे व काबुली हरभरा एकरी ३० ते ५० किलो बियाणे वापरावे.


🌱तुरीबद्दल माहिती🌱
👉 तुरीला पाण्याचा ताण दिसत असल्यास व सिंचनाची व्यवस्था असल्यास लगेच सिंचन करावे.
👉 पाणी कमी असल्यास एक सरी आड सिंचन करू शकता फुलं लागण्यापूर्वी सिंचन करण्याला महत्व असते.
👉 सोयाबीन निघाल्यानंतर तुरीच्या खोडाच्या जवळ दीड फुटापर्यंत खोल मशागत केल्यास मुळं तुटतात, त्यामुळे खोडाजवळ खोल मशागत न करता हलकी मशागतच करावी.
👉 तुरीचे शेंडे खुडणी शक्यतो ७५ दिवसानंतर करू नये.
👉 सोयाबीन काढल्यानंतर तुरीला खत द्यायचं असल्यास शक्यतो २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ पेरून द्यावे.
👉 वाळत असलेल्या तुरीचे झाड उपटून पहावं, त्याच्या मुळाशी पांढरी बुरशी असल्यास हा क्लोरोशियम रॉट ही बुरशी आहे, त्याला सुखई किंवा प्रोपिको एकरी २०० ते ३०० मिलीची आळवणी करावी.
👉 परंतु मुळं खराब व खोडाचे उभे दोन भाग केल्यास काळी रेषा खोडामध्ये दिसली तर तो फ्युजॅरिअम विल्ट आहे, त्यासाठी ट्रायकोडर्माची किंवा क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिलची आळवणी करावी.
👉 मुळं चांगली व खोडावर डाग पडून झाडं वाळत असल्यास तो फायटोप्थोरा आहे, त्यासाठी खोडावर क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्डचा ३० ते ४० ग्रॅम प्रति पंपाचा दाट फवारा द्यावा.
👉 ज्या ठिकाणी पानं गुंडाळणारी अळी कमी आहे तिथे दुर्लक्ष करावे, मात्र अळीचे प्रमाण जास्त असल्यास पांडा सुपरची फवारणी करावी.
👉 तुरीला विविध अवस्थांमध्ये तीन फवारे योग्य पद्धतीने दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. त्यातील पहिला फवारा हा फुलं लागताना किंवा २५ टक्के फुलोरा अवस्थेत द्यावा, ज्यामध्ये अळीनाशकामध्ये इमान १५ ग्रॅम, फुलांची संख्या वाढण्यासाठी झेप १५ मिली अधिक १२:६१:० १०० ग्रॅम व त्यातही मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी झिंक ईडीटीए (Zinc EDTA) २५ ग्रॅम सोबत घ्यावे.
3,590000
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: ५-१०-२०२६

🌤हवामान अंदाज🌤
👉 या आठवड्यात सुद्धा सगळीकडं कोरडं हवामान अपेक्षित असून एक-दोन ठिकाणी तुरळक हलका पाऊस सोडला तर इतर ठिकाणी सगळीकडं कोरडं हवामान राहील.
👉 गेल्या आठवड्याप्रमाणे कमाल तापमान अधिक राहील आणि ऑक्टोबरची उष्णता जाणवेल. कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.
👉 पूर्व विदर्भात अकोला, अमरावती सोबत जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३५ ते ३९ अंश व उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमान हे ३५ ते ३७ अंशादरम्यान राहील.
👉 रब्बी हरभरा पेरणी करण्यापूर्वी ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया आवश्यक करावी. हरभऱ्याचे शक्यतो बूस्टर जॅकी किंवा बूस्टर संशोधित नवीन हरभरा शूटरची निवड करावी.
👉 गव्हाच्या पेरणीची घाई करू नये. रब्बी ज्वारी, करडीच्या पेरण्या लवकर आटोपाव्या. सोयाबीनचे कुटार जनावरांसाठी जतन करून ठेवावे.
3,100000
🌱तुरीबद्दल माहिती🌱
👉 खतांचा वापर: पाऊस पडल्यास या अगोदर खताचा वापर केला नसल्यास, चांगला ओलावा जर असेल तर रासायनिक खताचा आपण तिथे वापर करू शकतो. त्यामध्ये २०:२०:०:१३ किंवा शक्यतो २४:२४:०:८ + पोटॅश अशी खते वापरावीत.

👉 फायटोप्थोरा ब्लाइट नियंत्रण: तुरीवरील खोडावरील डाग हे फायटोप्थोरा ब्लाइटचे लक्षण आहेत. त्या ठिकाणी भविष्यात फांद्या मोडून झाडे वाळू शकतात. यासाठी खोडावर आपल्याला क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ४० ग्रॅम प्रति पंप याचा खोडावर फवारा देणे अत्यंत गरजेचे आहे. तो न चुकता खोडावर डाग असल्यास द्यावा.

👉 फ्युझॅरियम व्हिल्ट (मर रोग): फ्युझॅरियम व्हिल्ट म्हणजे मर जी आहे, ती फुले लागल्यानंतर जे झाडे मरतात, त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 'ट्रायकोडरमा' या जैविक बुरशीनाशकाचा ड्रेनचिंगद्वारे (आळवणीद्वारे) वापर करावा.

👉 शेंडे खुडणे: तुरीचे शेंडे खुडणे ७५ दिवसांपर्यंत करू शकता. ज्या ठिकाणी शेंडे खुडणी झाली नाही, अशा शेतकऱ्यांना जमिनीत ओलावा असल्यास शेंडे खुडणी करू शकता; मात्र शक्यतोवर ७५ दिवसांनंतर शेंडे खुडणी टाळलेली बरी.

👉 कोळी कीड व वांझ रोग नियंत्रण: यावर्षी बऱ्याच ठिकाणी पावसाचा खंड असल्यामुळे कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे व ती कीड स्टेरिलिटी मोझॅक (म्हणजे वांझ रोगाचा) प्रसार करण्यास कारणीभूत असते. वांझ रोगाचे झाड हे पाने याचे बारीक होतात, गुच्छ दिसतात व जास्त हिरवे असतात असे झाड दिसताबरोबर उपटून टाकणे आणि कोळी या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ओमाईट, मॅजिस्टर किंवा अबामेक्टिन या कोळीनाशकाचा फवारा देणे गरजेचे आहे.
6,530000
🟢 श्री गजानन जाधव यांचा महत्वाचा कृषी सल्ला 🟢

🌱सोयाबीन बद्दल माहिती🌱
या आठवड्यात काही जागी चांगला, कुठे मध्यम व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याने, पाऊस पडल्यास सोयाबीनचे नियोजन कसे करावे?

👉 हलकी जमीन व कोरडवाहू असलेल्या बहुतांश ठिकाणी सोयाबीन सुकले आहे किंवा पिवळे पडले असल्याने, अशा ठिकाणी आता काही फारसा खर्च करणे योग्य नाही. फक्त अशा ठिकाणी सोयाबीनवर अळींचा प्रादुर्भाव असल्यास व सोयाबीन हिरवे असल्यास 'व्हिटारा प्लस' किंवा 'सिंजो' हे अळीनाशक फवारावे व त्यासोबतच १३:०:४५ या विद्राव्य खताचा वापर करू शकता.

👉 भारी जमिनीतील किंवा सिंचन केलेल्या सोयाबीनमध्ये पाऊस पडल्यानंतर थोडा खर्च करण्यास हरकत नाही. अशा ठिकाणी अळीनाशक 'व्हिटारा प्लस' किंवा 'सिंजो' यासोबत एक बुरशीनाशक 'नॅझो सुपर' किंवा 'विसल्फ' अधिक दाणा भरण्यासाठी १३:०:४५ व 'भरारी'चा फवारणीत वापर करू शकता.

👉 या वर्षाच्या आपल्या प्रमुख शिफारसी व त्यांचा परिणाम:

✅ पहिली शिफारस: आम्ही जिल्ह्यानुसार वाणांची निवड सांगितली होती. शिफारसित वाणांची त्या-त्या जिल्ह्यात लागवड केल्यामुळे ते शेतकरी त्या-त्या वाणांबद्दल समाधानी आहेत. पावसाच्या खंडामुळे होणारे नुकसान सोडल्यास, त्या वाणांचे उत्तम प्रदर्शन त्या-त्या जिल्ह्यात झाले आहे.

✅ यावर्षी पावसाचे मोठे खंड व सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने, उताराला आडवी पेरणी किंवा बेड किंवा बीबीएफ (BBF) पद्धतीचा वापर करण्याची शिफारस केली होती. ज्यांनी या पद्धतीने पेरणी केली, त्यांच्या सोयाबीनने इतरांच्या तुलनेत बऱ्यापैकी ताण सहन केला आहे.

✅ पावसाच्या खंडामुळे खोडकीड व चक्रभुंग्याचा धोका वाढेल, त्यासाठी प्रतिबंधात्मक बीजप्रक्रिया व पेरणीनंतर १५-२० दिवसाला 'रेज' किंवा 'रावडी'चा फवारा शिफारस केली होती. ज्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या, त्यांच्या शेतात खोडकीड व चक्रभुंगा कमी आहे.

👉 या सर्व बाबींचे आपण बारकाईने निरीक्षण करून, पुढच्या वर्षासाठी याचा बोध घ्यावा.

🌱कापसाबद्दल माहिती🌱
पावसाचा अंदाज असल्याने, पाऊस पडण्यापूर्वी व पडल्यानंतर काय उपाय करावेत?
👉 पाऊस पडण्यापूर्वी: सर्वप्रथम ज्या कापसाला पाते भरपूर आहेत, मात्र पाण्याचा तान बसला, त्याला पाऊस पडण्यापूर्वी पातेगळ कमी व्हावी यासाठी प्लॅनोफिक्स ५ मिली + युरिया १०० ग्रॅम फवारावे. यासोबत किडीनुसार, फुलकिडा जास्त असल्यास सरेंडर किंवा पांढरी माशी जास्त असल्यास ओडाची एक्स्ट्रा किंवा दोन्ही किडी जास्त असल्यास सरेंडर किंवा तपूस + ओडाची एक्स्ट्रा हे दोन्ही फवारू शकता. मात्र ही प्लॅनोफिक्सची फवारणी पाऊस पडण्याच्या आधी करणे जास्त फायद्याचे असते.

👉 पाऊस पडल्यानंतर खत व्यवस्थापन: ज्या ठिकाणी पावसाच्या तानामुळे खतांची मात्रा दिली नसेल, अशा ठिकाणी चांगला पाऊस पडल्यास खतांची मात्रा द्यावी. त्यामध्ये शक्यतो २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ + पोटॅशचा वापर करावा.

👉 मध्यम पाऊस पडल्यास: याच खतांची आळवणी (Drenching) करू शकता. किंवा जिवाणू खते जसे NPK Boost DX वाढीच्या अवस्थेत, किंवा फूल-पाते असतानी P-Boost DX + K-Boost DX प्रत्येकी अर्धा किलोची आळवणी केल्यास त्वरित परिणाम दिसून कमी खर्चात व्यवस्थापन होईल.

👉 नवीन पात्यांसाठी: पाऊस पडल्यानंतर पातेगळ झाल्यास, जमिनीत ओल व अन्नद्रव्य असताना नवीन पाते काढण्यासाठी झेप १५ मिली प्रति पंप फवारणीत वापर करावा.

👉 झाडे सुकल्यास उपाय: काही जागी पाऊस पडल्यानंतर शॉक लागून काही झाडे सुकू शकतात, त्यासाठी काही करण्याची आवश्यकता फारशी नाही. फक्त अशा झाडांच्या मुळाशी १९:१९:१९ + रायझरची आळवणी करावी.

👉 पाण्याचा तान नसलेल्या कापसासाठी: सिंचन व्यवस्था किंवा पाण्याचा तान नसलेल्या कापसावर फवारणीमध्ये फुलकिडा जास्त असल्यास सरेंडर, नॉव्हेक्ट किंवा तपूस पांढरी माशी जास्त असल्यास ओडाची एक्स्ट्रा दोन्ही असल्यास दोन्ही कीटकनाशके घ्यावीत. यासोबत कमी वाढ असल्यास टॉप-अप किंवा योग्य वाढ असल्यास नवीन पात्यांसाठी झेप या संजीवकाचा वापर करावा.

👉 ठिबकवरील कापसासाठी: ठिबक वरील कापसाला गरजेनुसार पाते-फुलांच्या अवस्थेत १२:६१:० (२ वेळा), त्यानंतर ०:५२:३४ (२ ते ३ वेळा), त्यानंतर बोंड लागल्यानंतर १३:०:४५ (२ ते ३ वेळेस) व बोंड पकव होताना Big B (२ वेळेस) अशी विद्राव्य खतांची आळवणी करता येईल. किंवा स्वस्तात २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ + पांढरा पोटॅश सुद्धा वापरता येईल.

👉 रसशोषक किडींचे नियंत्रण: पाऊस ज्या ठिकाणी जोराचा पडेल, तिथली रसशोषक कीड बऱ्यापैकी कमी होईल. अशा जागी निरीक्षण करूनच फवारणीचा निर्णय घ्यावा.

👉 डवरणी: शेवटची डवरणी असल्यास, डवऱ्याला दोरी बांधून मध्ये डवरणी करावी ज्यामुळे तिथे मातीची भर पडेल. व अशा तासात दोरी सोडून पुन्हा डवरणी करून माती मोकळी करून घ्यावी.
5,070000
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: २१ / ०९ / २०२६

🌦हवामान अंदाज 🌦
👉 सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे बहुतांश विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
👉 ज्यामध्ये राज्याच्या दक्षिणेकडील जिल्हे जसे गोंदिया, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्यम ते चांगल्या पावसाची आशा असून, त्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नागपूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे इत्यादी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
👉 उत्तरेकडील खानदेशात मात्र पावसाची शक्यता कमी आहे.
👉 याचबरोबर शेजारच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे.
👉 मान्सूनने १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून माघार घेतली आहे व राज्यातून सुद्धा २७ सप्टेंबरनंतर कधीही मान्सून माघारी फिरेल.
👉 ज्यामुळे २७ सप्टेंबरनंतर हवामान कोरडे राहून किमान तापमानात वाढ सुद्धा होऊ शकते.
4,260000
🌱तुरीबद्दल माहिती🌱
👉 या वर्षी तुरीचा पेरा वाढला आहे सध्या तुरीची अवस्था वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे.
👉 खोडावर डाग पडून फांद्या व नंतर झाड वाळणे याला फांदीमर किंवा फायटोप्थोरा असे म्हणतात. या रोगाला थांबवण्यासाठी खोडावर रिडोमिल गोल्ड किंवा क्रिप्टॉक्स (म्हणजे मेटलॅक्सिल + मँकोझेब) या संयुक्त बुरशीनाशकाचा दाट फवारा अवश्य द्यावा. जमिनीत ओलावा असल्यास काही औषध जमिनीवर सुद्धा पडेल असे फवारावे. या रोगाचा प्रादुर्भाव नसल्यास भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक ट्रायकोडर्माची आळवणी करावी.
👉 तुरीला फांद्याची संख्या जास्त असल्यास उत्पादनात वाढ होते. त्यामुळे योग्य वाढ असल्यास तुरीचे 25, 50 व 75 दिवसाला शेंडे खुडावे. दोन वेळा शेंडे खुडायचे असल्यास 30-60 दिवसादरम्यान व एकाच वेळेस शेंडे खुडायचे असल्यास 75 दिवसापर्यंत कधीही एकदा शेंडे खुडू शकता.
👉 पानांचे गुच्छ होऊन त्या झाडात जास्त हिरवेपणा राहून फुलं व शेंगा न लागणे म्हणजे हा रोग वांझ रोग आहे, म्हणजे स्टेरिलिटी मोझॅक. याचा प्रादुर्भाव झालेले झाडे सतत उपटत राहावे व याला पसरवणारा कोळी किडीचा नियंत्रण ओमाईट, मॅजिस्टर किंवा ॲबामॅक्टिन फवारून प्रतिबंधात्मक नियंत्रण करावे.
👉 तुरीला खताची मात्रा लागवडीपासून 60 दिवसापर्यंत सुद्धा देता येते व दुसरी मात्रा गरजेनुसार सोयाबीन निघाल्यानंतर सुद्धा देऊ शकता.
👉 तुरीच्या खोडावर गाठी तयार होत असल्यास हा स्टेम कॅंकर नावाचा रोग आहे. त्याच्या नियंत्रणासाठी त्या भागावर कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचे बुरशीनाशक फवारावे.
👉 तुरीवर पानं गुंडाळणारी किंवा पानं खाणारी अळी हे जास्त प्रमाणात असल्यास पांडा सुपर किंवा इमान या अळीनाशकाचा फवारा द्यावा.
4,120000
🟢श्री गजानन जाधव यांचा कृषी सल्ला🟢

🌱सोयाबीनबद्दल माहिती🌱
👉 बहुतांश ठिकाणी सोयाबीनमध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. पाण्याचा ताण पडत असल्यास व सिंचनाची व्यवस्था असल्यास त्वरित हलके सिंचन करावे.
👉 सोयाबीन ताण सहन करण्यासाठी 13:0:45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट या विद्राव्य खताचा 100 ग्रॅम प्रति पंप वापर करावा.
👉 या वर्षी किडीस पोषक वातावरण असल्याने सोयाबीनवर अळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
👉 ऊन धरलेल्या सोयाबीनवर फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी दुपारी फवारणी टाळावी.
👉 फवारणीमध्ये ताण पडलेला असल्यास फुलं वाढणाऱ्या किंवा दाणा मोठा करणाऱ्या संजीवकाचा वापर टाळावा.
👉 ओलावा योग्य असेल म्हणजे पाऊस पडला किंवा सिंचन केलेल्या सोयाबीनवर अळीच्या नियंत्रणासाठी विटारा प्लस किंवा सिंजो वापरावे. बुरशीनाशकामध्ये नॅझो सुपर किंवा विसल्फ वापरू शकता. तसेच विद्राव्य खतामध्ये बिग बी किंवा 13:0:45 घेऊ शकता. योग्य ओलावा असेल तरच भरारी सारख्या संजीवकाचा वापर करावा.
👉 पांढरी माशी जास्त असल्यास ओढाची एक्स्ट्रा किंवा ॲसिटामाप्रिड किंवा पांडा सुपर सुद्धा यात घेऊ शकता.
👉 काही ठिकाणी यलो मोझॅकमुळे काही झाडं पिवळी पडत आहे, ते झाडं सतत उपटत राहावी व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे.
👉 या वर्षीच्या पेरणी नंतरच्या पावसाच्या खंडामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. खोड पोखरल्यामुळे शेंगा गळणे, शेंगा कमी लागणे, सोयाबीन पिवळं पडणे, झाडं सुकणे हे प्रकार सध्या काही ठिकाणी दिसत आहे. मात्र आता या अळीच्या नियंत्रणावर खर्च करून फारसा फायदा होत नाही. फक्त विद्राव्य खते फवारून वरच्या वर अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करावा. शेंगात दाणा भरतांना साधारणतः 60 दिवसा दरम्यान 0:52:34, नंतर 10 दिवसांनी 13:0:45 व शेवटी 10 दिवसांनी बिग बी अशा विद्राव्य खतांचा फवारणीतून किमान दाणा भरण्यास मदत होईल असे फवारे करावे.
👉 काही जागी लाल कोळ्याचा प्रादुर्भाव वाढल्याने पानं पांढुरके होऊन निस्तेज झाली आहे, अशा जागी सल्फर WDG थंड वातावरण असल्यास वापरावे.

🌱कापसाबद्दल माहिती🌱
👉 या वर्षी किडीस पोषक वातावरणामुळे मावा, तुडतुडा भरपूर वाढला. ताण पडलेल्या भागात फुलकिडा सुद्धा वाढून पानं निस्तेज, पांढुरकी व कडक झाली आहे; तर कुठे पांढरी माशी सुद्धा वाढली आहे.
या रसशोषक किडींच्या एकत्रित नियंत्रणासाठी कमी कीड असल्यास तपूस किंवा नोव्हेक्ट हे कीटकनाशक व जास्त प्रमाण असल्यास ओढाची एक्स्ट्रा किंवा रोनफेनचा फवारणीत वापर करावा.
👉 लाल कोळी व फुलकिडा किंवा दोन्हीपैकी काही असल्यास सोबत सल्फर डब्ल्यूडीजी 20 ग्रॅम वापरू शकता.
👉 गुलाबी बोंडआळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी बोंड लागण्यापूर्वी व लागलेल्या फुलांची तपासणी करा. पाकळ्या बंद असलेल्या फुलांमध्ये आळी असते ते तोडून नष्ट करा. पाते लागण्यापासून शेतात लाईट ट्रॅपचा वापर करा व प्रत्येक फवारणीत पाते लागल्यानंतर अळीनाशक आणि अमावस्या नंतरच्या फवारणीत अंडीनाशक सरेंडरचा अवश्य वापर करा.
👉 ज्या ठिकाणी कमी वाढ आहे तिथे पाण्याचा ताण असल्यास एक सरीआड सिंचन करावे. फवारणीत टॉपअप किंवा रिफ्रेशचा वापर करावा, ओलावा असल्यास खतांचा वापर करावा व ओलावा असल्यास शक्य असल्यास प्रति एकर अर्धा किलो एनपीके बूस्ट Dx, दीड लिटर रायझर अधिक तीन किलो 19:19:19 ची आळवणी करावी.
👉 पातेगळ अनेक कारणांमुळे होते त्यापैकी पातेआळीने दिलेल्या डंकामुळे असल्यास अळीनाशक फवारावे, ताण पडल्यामुळे असल्यास सिंचन करावे, नैसर्गिक असल्यास प्लॅनोफिक्स 4 मिली प्रति पंप फवारावे, अन्नद्रव्याच्या कमतरतेने असल्यास अन्नद्रव्याचा पुरवठा करावा.
👉 जमिनीत ओलावा असेल किंवा सिंचनाची व्यवस्था असेल तरच रासायनिक खताचा वापर करावा, कोरड्यात रासायनिक खते देणे टाळावे.
👉 शेवटची डवरणी डवऱ्याला दोरी बांधून करून त्या तासात पुन्हा दोरी सोडून मोकळे डवरे चालवून माती मोकळी करावी.
👉 कापसाची उभाट किंवा जास्त वाढ होत असल्यास चार-साडेचार फुटावर कापसाचा शेंडा खोडावा.
3,620000
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२६

🌦 हवामान अंदाज 🌦
👉 या आठवड्यात सुद्धा सध्या असलेल्या हवामानात फारसे बदल अपेक्षित नाही. कोणताही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने राज्यात सर्वत्र दमदार दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता या आठवड्यात नसून स्थानिक परिस्थितीनुसार दुपार नंतरचा विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो; ज्याचे प्रमाण पूर्व विदर्भात तुलनात्मक अधिक, पश्चिम विदर्भात मध्यम व राज्यातील इतर भागात कमी राहू शकते. तसेच राज्यात ऊन व ढग यांचा लपंडाव सम्मिश्र प्रमाणात राहू शकतो.

👉 पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे व गरजेनुसार करावा. सिंचनाची व्यवस्था असल्यास गरजेनुसार ताण पडण्यापूर्वी सिंचन करावे. जिथे शक्य आहे तिथे पिकांमध्ये अंतरमशागत करावी. काही काळ पाण्याचा ताण सहन करण्यासाठी 13:0:45 या विद्राव्य खताचा फवारणीत वापर करावा. शक्यतो फवारणीचे कामे भर उन्हात न करता सकाळी किंवा संध्याकाळी करावे ताण असलेल्या पिकांना खते देणे तूर्त टाळावे.
3,120000
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ.संभाजीनगर🔴
दिनांक: २४ ऑगस्ट २०२६

🌦हवामान अंदाज🌦
👉 सोमवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी विदर्भात काही जागी विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित आठवड्यात हवामानात विशेष बदल नसून कोणत्याही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता राज्यात कुठेही नाही.
परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार दुपारनंतरचा काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो, तसेच ढग व ऊन असे मिश्रित वातावरण राहू शकते.

👉 सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा ताण बसण्यापूर्वीच पिकांना सिंचन करावे. पाण्याचा ताण बसल्यानंतर सिंचन केल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ शकते. शक्य असल्यास पिकांवर ताण सहन करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:०:४५ या विद्राव्य खताचा फवारा द्यावा.

👉 शक्य असल्यास हलकी आंतरमशागत करत राहावी, ज्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. फवारणीची कामे ही शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. दुपारी ऊन असल्यास फवारणीची कामे करू नयेत. फवारणीत जहाल कीटकनाशकांचा वापर करू नये.

👉 आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधांचे प्रमाण हे २० लीटरच्या पंपाचे आहे. पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचे प्रमाण बदलावे. शक्यतो विषबाधा होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी.
6,740000

Showing 30 of 79 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) (@whitegoldtrust) हा tgdio वर बिझनेस न्यूज श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे १२,३३३ सबस्क्राइबर आहेत.

मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) (@whitegoldtrust) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @whitegoldtrust वर मोफत सबस्क्राइब करा.

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) चांगला बिझनेस न्यूज चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे १२,३३३ सबस्क्राइबर आहेत. सारख्या बिझनेस न्यूज चॅनेल्सशी तुलना करा.

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @whitegoldtrust पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.