सकाळच्या दोनचार गोष्टी... 🌿
सकाळी सकाळी एक गोष्ट आवर्जून करायची असते.
आरश्यात बराच वेळ ताटकळत पहायचं.बराच म्हणजे किमान चारेक मिनिटे.आतून किती आत्मविश्वास उफाळून येतोय याची आंतरिक नोंद ठेवायची.चेहऱ्यावरचं समाधान वाचायला विसरायचं नाही.ते वाचण्याचं कसब आपल्या स्वत:त असतं.आतून आपण सुखी आणि समाधानी आहोत असा आवाज आला की उजवा हात अवघडत का होईना पाठीपर्यंत न्या आणि पाठ थोपटवा.आणि आतून नकार आला तर तोच हात हृदयापर्यंत न्या आणि सांगा पठ्ठया कमी पडतोयस आणखी लढायला हवं.
बस येवढं केलं तरी किती ऊर्जा येते पहा...
प्रत्येक जण अपूर्ण आहे मित्रांनो, कमी पडलो तर निराश नाही व्हायचं.
अधिक ऊर्जा सोबत घ्यायची अन् चालत राहायचं...
चालणे क्रमप्राप्त आहे...
©® ©उद्देश









