⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ Telegram channel photo

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

@ghebhararituPublic Channel

🎯🥇"Nothing Is Impossible फक्त जिद्द पाहिजे..!✌️💯 अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】 👇👇Join 👇👇 http://:t.me/ghebhararitu

राजकारणमराठीभारत

577

Last views

१८.९k (18,945 subscribers)
सदस्य
—
Rating
135
Total Posts
Oct 19, 2026, 2:23 PM
अपडेट केले
Oct 10, 2025
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
Username@ghebhararitu
Categoryराजकारण
Languageमराठी
Countryभारत
सदस्य18,945
Channel TypePublic Channel
Created१० ऑक्टो, २०२५
Last Updated१९ ऑक्टो, २०२६ • ३ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#333728-598
भाषा रँकिंग
#204+1
श्रेणी रँकिंग
#7830+5

सहभागींची वाढ

एकूण: 18.9K30 Days growth: -3321.7%
09/2009/2509/3010/0510/1010/1510/19
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
20:09:202619,277
21:09:202619,277
22:09:202619,277
23:09:202619,277
24:09:202619,182
25:09:202619,182
26:09:202619,182
27:09:202619,182
28:09:202619,182
29:09:202619,182
30:09:202619,182
01:10:202619,182
02:10:202619,182
03:10:202619,182
04:10:202619,182
05:10:202619,182
06:10:202619,182
07:10:202619,182
08:10:202619,182
09:10:202619,182
10:10:202619,182
11:10:202619,011
12:10:202619,011
13:10:202619,011
14:10:202619,011
15:10:202619,011
16:10:202619,011
17:10:202619,011
18:10:202619,011
19:10:202618,945
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:202620,926
Week of 13:04:202620,771
Week of 20:04:202620,705
Week of 27:04:202620,705
Week of 04:05:202620,544
Week of 11:05:202620,544
Week of 18:05:202620,544
Week of 25:05:202620,358
Week of 01:06:202620,358
Week of 08:06:202620,220
Week of 15:06:202620,220
Week of 22:06:202620,110
Week of 29:06:202620,110
Week of 06:07:202620,110
Week of 13:07:202619,926
Week of 20:07:202619,827
Week of 27:07:202619,741
Week of 03:08:202619,741
Week of 10:08:202619,585
Week of 17:08:202619,585
Week of 24:08:202619,456
Week of 31:08:202619,363
Week of 07:09:202619,363
Week of 14:09:202619,277
Week of 21:09:202619,182
Week of 28:09:202619,182
Week of 05:10:202619,011
Week of 12:10:202619,011
Week of 19:10:202618,945
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202620,705
May 202620,358
June 202620,110
July 202619,741
August 202619,456
September 202619,182
October 202618,945
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202618,945

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1जीवनात स्वतःला स्वतः समजून घेता आलं की दुसर कोणी समजून घेणारं नसलं तरी3.1K
  2. #2वडार..3.0K
  3. #3👉🏻 योग्य दिशेने झालेली हळू प्रगती ही दिशा नसलेल्या वेगापेक्षा नक्कीच2.9K
  4. #4गुढीपाडवा... 🚩🚩2.9K
  5. #5पुढील ३ तासांत बीड,लातूर,नांदेड,परभणी, पुणे येथे काही ठिकाणी विजांच्या2.9K
  6. #6जीवनात सर्व काही आपल्या मनासारखचं होईल असं काही नाही ना राव काही गोष्ट2.7K
  7. #7पुढील ३ तासात अहिल्यानगर,बीड,धाराशिव,पुणे,सांगली,सोलापूर या जिल्ह्यात 2.7K
  8. #8प्रत्येकाचा आयुष्यात एक व्यक्ती अशी हवी की तिला आपल्या व्याहारिक आयुष्2.7K
  9. #9🔴 सगळे आहे. पुस्तके, नोट्स, मार्गदर्शन, टेस्ट सिरीज वगैरे वगैरे पण..2.6K
  10. #10👉🏻 तुम्हाला जर परिवर्तनाची भीती वाटतं असेल तर तुम्ही स्वतःला Comfort2.6K

नवीनतम पोस्ट्स

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

२२ ऑक्टो, २०२६, ०१:४६

Photo1/2
झोप असते विश्रांतीसाठी, सोंग असतं वास्तवापासून पळण्यासाठी...!!
577005
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

२१ ऑक्टो, २०२६, १७:३४

Photo1/4
♦️शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..

👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
927000
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

२१ ऑक्टो, २०२६, ०१:४६

Photo1/2
चेहऱ्यावर तेज, मनात विश्वास,
ध्येय गाठण्याचा अखंड ध्यास....

नकारात्मकतेला ठाम नकार,
सातत्य आणि संघर्ष हाच विजयाचा आधार...

दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
1,220000
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

२१ ऑक्टो, २०२६, ००:०१

Photo1/2
पूजन..🙏🥰
“पुस्तकापेक्षा प्रिय आणि पुस्तकापेक्षा पूजनीय असं माझ्यासाठी दुसर काहीच नाही.. मी माझ्या आयुष्यात पैसा किती कमवला?यापेक्षा मी माझ्या जीवनात विचार कमावले,चांगली माणसं कमावली आतापर्यंत मी स्वतः एक चांगला वाचक आणि लेखक आहे माझी खरी संपत्ती हीच आहे आणि ह्या संपत्तीच्या बळावर मी असंख्य लोकांपर्यंत पोहोचलो ह्या पुस्तकात चार पुस्तकं स्वतः मी लिहलेली आहे.. दसऱ्यानिमित्त मी आज माझ्या पुस्तकाला वंदन केलं...सर्वाना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..”
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक,कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
मो. 8806379959
1,2300015
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

२० ऑक्टो, २०२६, ११:२०

Photo1/2
"संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या दारी. विजयादशमीच्या शुभेच्छा!" 🚩🌿🌿
1,5100019
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१९ ऑक्टो, २०२६, २१:५९

निसर्गाशी कृतज्ञ राहण्यातच माणसाचे खरे सुख सामावलेले आहे.
लेखकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे, जी वाचकाला कल्पनेच्या विश्वात सहज घेऊन जाते. मुक्या प्राण्यांचा, झाडांचा आणि पक्षांचा मानवी भावनांशी संबंध जोडून जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवण्याची लेखकाची शैली विलक्षण आणि बोधप्रद आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी वाचकाला अंतर्मुख करणारा आणि योग्य मूल्ये शिकवणारा एक ठोस बोध मिळतो, जो आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
अनिल भगवान चव्हाण यांचा 'शोध सुखाचा' हा कथासंग्रह केवळ ८८ पानांचा छोटाखानी संग्रह असला, तरी त्याचा प्रभाव वाचकाच्या मनावर दीर्घकाळ टिकून राहणारा आहे. हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या चुका सुधारण्याची, नाती जपण्याची आणि निसर्गावर प्रेम करण्याची नवी दृष्टी देते. जीवनात शांतता, समाधान आणि खऱ्या सुखाचा मार्ग शोधू इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकाने हे पुस्तक एकदा तरी आवर्जून वाचायलाच हवे.
पुस्तकाचे नाव: शोध सुखाचा (कथासंग्रह)
• लेखक: अनिल भगवान चव्हाण
• प्रकाशक: साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
• प्रथम आवृत्ती: १४ एप्रिल २०२६
• पृष्ठसंख्या: ८८ | मूल्य: १६०/- रुपये
समीक्षक -पल्लवी शिंदे माने
मॅडिसन, विस्कॉन्सिन, अमेरिका (Madison, Wisconsin, America)
1,800004
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१९ ऑक्टो, २०२६, २१:५९

'शोध सुखाचा': एक जीवनभाष्य..आयुष्य जगण्यास प्रेरणा देणारा सुंदर कथासंग्रह..
(पुस्तक समीक्षण )
थेट अमेरिकेतून
”आजच्या या गतिमान, यांत्रिक आणि धडपडीच्या युगात प्रत्येक माणूस ज्या एका गोष्टीच्या मागे अहोरात्र धावतो आहे, ती गोष्ट म्हणजे 'सुख'! पण हे सुख नक्की कशात आहे? भौतिक सोयी-सुविधांमध्ये की मनाच्या गाभाऱ्यात? याच चिरंतन प्रश्नाचा अत्यंत संवेदनशीलतेने वेध घेणारा सुंदर कथासंग्रह म्हणजे लेखक अनिल भगवान चव्हाण यांचे 'शोध सुखाचा' हे पुस्तक होय. लेखक स्वतः एक कवी आणि शिक्षक असल्यामुळे त्यांच्या लेखनात समाजाचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि वाचकांच्या मनाला सुसंस्कृत बनवणारा एक हळूवार दृष्टिकोन पावलोपावली जाणवतो. लेखकाने आपल्या मनोगतात नमूद केल्याप्रमाणे, हा विचार एका रात्रीत जन्माला आलेला नाही, तर २००८ पासून २०२६ पर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात समाजातील विस्कळीत होत चाललेली माणसे पाहून आणि दीड वर्षांची निरंतर मेहनत घेऊन त्यांनी हे शब्दरूप साकारले आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचकाला पहिल्याच नजरेत खिळवून ठेवणारे आणि विचार करायला लावणारे आहे. मावळत्या सूर्याच्या सोनेरी-तांबूस किरणांमध्ये, संथ पाण्याच्या पार्श्वभूमीवर घोड्यावर स्वार होऊन पुढे जाणाऱ्या एका व्यक्तीची सावली यावर दाखवली आहे. हे चित्र निरंतर चालणाऱ्या मानवी जीवनाचे आणि ध्येयाच्या प्रवासाचे प्रतीक वाटते. तर मलपृष्ठावर लेखकाने दिलेली एक प्रामाणिक आणि महत्त्वपूर्ण सूचना वाचकाला कथेशी अधिक जवळीक साधून देते, जिथे ते म्हणतात की, यातील काही कथा त्यांच्या स्वतःच्या जीवनशैलीशी तर काही सामाजिक वास्तवाशी जोडलेल्या आहेत.
पुस्तकाची वैचारिक सुरुवात 'सुख म्हणजे काय..?' या चिंतनात्मक प्रकरणाने होते. आजचा माणूस पैसा, पद आणि प्रतिष्ठा या त्रिसुत्रीलाच सुख मानण्याची चूक करत आहे. लेखक भगवान बुद्धांचे अजरामर उदाहरण देऊन हा भ्रम अत्यंत सुंदरतेने दूर करतात. जर राजवैभवात आणि संपत्तीत सुख असते, तर एका राजपुत्राने त्याचा त्याग का केला असता? हा प्रश्न मनाचा ठाव घेतो. सुख हे बाहेरील जगतात नसून ते आपल्या अंतर्मनातील 'समाधान' आणि 'सकारात्मक विचारांमध्ये' दडलेले असते, हा मोलाचा संदेश लेखक देतात. जोपर्यंत आपण चांगल्या विचारांचे केवळ वाचन न करता, त्यानुसार प्रत्यक्ष आचरण करत नाही, तोपर्यंत जीवनात खरा आनंद उरणार नाही, हे वास्तव लेखक उघड करतात.
पुस्तकातील कथा मानवी स्वभावाच्या, नात्यांच्या आणि निसर्गाच्या विविध छटांवर भाष्य करतात. 'विश्वास नावाचं झाड' ही कथा लेखकाने एका अत्यंत देखण्या रूपकातून मांडली आहे. 'विश्वास' नावाच्या वडाच्या भक्कम झाडावर 'प्रेम' आणि 'मैत्री' नावाचे दोन पक्षी गुण्यागोविंदाने संसार करत असतात. परंतु, समाजात ज्याप्रमाणे काही विकृत किंवा यांत्रिक 'माकड प्रवृत्तीची' माणसे असतात, तशीच माकडे या झाडावर येतात आणि त्यांच्या उन्मादामुळे नात्यांमध्ये विसंवाद निर्माण होतो. शेवटी एका लाकूडतोड्याच्या रागामुळे ते विश्वासाचे झाडच मुळासकट उन्मळून पडते. नात्यांमध्ये कितीही वाद झाले तरी चालतील, पण जर त्यांच्यातील 'विश्वास' नावाचा पायाच उखडला गेला, तर प्रेम आणि मैत्री कायमची नष्ट होते. नाती जपण्यासाठी विश्वासाची जपणूक करणे किती अनिवार्य आहे, हे ही कथा मनावर ठसविते.
'पैसा आणि सुख' ही कथा आजच्या काळातील एका गंभीर कौटुंबिक समस्येवर बोट ठेवते. दारूचा व्यवसाय करून गंठगंज संपत्ती कमवणारा एक व्यापारी स्वतः मात्र कोणत्याही व्यसनापासून दूर असतो आणि आपल्या कुटुंबासह सुखात जगत असतो. पण तथाकथित मित्रांच्या बळजबरीमुळे आणि चुकीच्या संगतीमुळे त्याला स्वतःला दारूचे व्यसन जडते. एका चुकीच्या निर्णयामुळे त्याचे हसते-खेळते घर, पत्नी आणि मुलांचे सुख कसे क्षणात कोळपून जाते, याचे अतिशय हृदयद्रावक चित्रण लेखकाने केले आहे. पैसा घरामध्ये भौतिक सुखे आणू शकतो, पण घरातील माणसांचे समाधान, सुख आणि प्रेम विकत घेऊ शकत नाही. व्यसन हे केवळ एका व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला नरकयातना देते, हा धडा ही कथा देते.
'कर्म नावाच्या झाडाची फळं...' ही निसर्गाप्रती आपली काय जबाबदारी आहे, याचे भान देणारी एक अत्यंत भावूक कथा आहे. एका आंब्याच्या अवाढव्य झाडावर अनेक पक्षांनी आपली घरटी बांधलेली असतात. जेव्हा झाडाला आंबे लागतात, तेव्हा त्या शेताचा मालक आंबे पाडण्यासाठी झाडावर जोरात दगड मारतो. आंबा तर पडत नाही, पण त्या दगडाच्या फटक्याने एका निष्पाप पक्षाचे घरटे खाली पडून अंडी फुटतात आणि तो पक्षी जागीच प्राण गमावतो. आपल्या एका कृतीमुळे निष्पाप जीवाचा बळी गेला, या भावनेने तो शेतकरी व्याकुळ होतो, त्याला पश्चात्ताप होतो. या पश्चात्तापातून तो स्वतःला बदलतो आणि झाडावर बोर्ड लावतो—"या आणि मनसोक्त आंबे खा.. पण झाडावर दगड मारू नका..!" आपले 'कर्म' हेच आपल्या सुखाचे आणि दुःखाचे कारण असते. आपण स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची किंवा मुक्या जीवांची हानी करता कामा नये.
1,740000
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१९ ऑक्टो, २०२६, १९:५६

टायगर श्रॉफवर हल्ला करणारे असे मुलं होते की ज्यांना दाढी मिशापण अजून नीट आल्या नसतील.
जर योग्य वयात आपण लोकांच्या हाताला काम देऊ शकलो नाही, तर ते गुन्हेगारीकडेच वळतील.
हातात आलेली पिस्तूल ताकद पण देते (खोटी का असेना) आणि पोटा पाण्याचा प्रश्न सुटतो.
याला आपण सामाजिक समस्या म्हणून पाहावे, की तरुण मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे का आकर्षिले जात आहे?
फक्त कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिल्यास याचे समाधान मिळणार नाही.
नाहीतर आज २ लोक जेल मध्ये जातील, उद्या दुसरे २० तसे तयार होतील.
अनिकेत पाटील.
1,7000026
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१९ ऑक्टो, २०२६, १७:२३

Photo1/2
जी गोष्ट ज्यांच्या कडे नाही त्या गोष्टीच महत्व त्यांच्या आयुष्यात खूप जास्त असते राव म्हणून कोणाच्या दिसण्यावरून किंवा असण्यावरून उगाच कोणाचा अपमान करू नका कारण आपली थोडीशी मस्करी कोणाच्या मनाला खूप मोठी जखम देऊ शकते!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Omsmshelke
1,7500025
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१९ ऑक्टो, २०२६, १४:०५

Photo1/2
सगळे काही तुकाराम मुंढे यांनीच करायचे का..? आपण..?

जागरूक नागरिक हीच देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. नागरिक जागरूक असतील तर सरकार, प्रशासन सर्वकाही व्यवस्थित कामे करतील. Awakened Citizenry is the backbone of nation's progress.
1,800008
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१९ ऑक्टो, २०२६, ००:५२

Photo1/2
वाढती महागाई, तुटपुंजे वेतन आणि जीवन जगण्याच्या वाढत्या खर्चाविरोधात संपूर्ण युरोपात जनक्षोभ उसळला आहे. इटली आणि फ्रान्समधील प्रमुख शहरांमध्ये याविरोधात रस्त्यावर उतरलेल्या लाखो आंदोलकांना हिंसक वळण लागले. इटलीतील मिलान, बोलोन्या आणि ट्यूरिन या शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमकी झाल्या. या हिंसाचारावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "लोकशाही मार्गाने शांततेत स्वतःचे म्हणणे मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण आंदोलनाच्या नावाखाली आमची शहरे आगीच्या खाईत लोटणे खपवून घेतले जाणार नाही," असा सज्जड इशारा मेलोनी यांनी दिला आहे.
1,9900012
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१८ ऑक्टो, २०२६, १९:०४

स्त्री.....कर्तव्य की प्रेम

आपल्या समाजाने स्त्रीला लहानपणापासूनच एकच मंत्र दिलाय - कर्तव्य कर. तिने आपल्या कामाशी प्रामाणिक असावं, आई-वडिलांचे उपकार कधीच विसरू नयेत, या सगळ्याला माझा विरोध नाही. किंबहुना, हे गुण असावेतच.

पण प्रश्न तिथे सुरू होतो, जिथे तिचं संपूर्ण आयुष्यच फक्त कर्तव्याच्या हिशोबात मांडलं जातं.

विचार करा, एका वयानंतर तिचं आयुष्य कसं वाटून टाकलं जातं. लग्न करणं म्हणजे आई-वडिलांवरचं ऋण फेडणं, शारीरिक जवळीक म्हणजे नवऱ्यासाठी केलेली तडजोड, मुलांवर प्रेम करणं म्हणजे आई म्हणून असलेली जबाबदारी, संसार सांभाळणं म्हणजे घरासाठीची ड्युटी आणि शेवटी उरलेलं आयुष्य समाज काय म्हणेल या भीतीपोटी जगणं.

मग तिची स्वतःची भावना कुठे गेली? ती कुठेच नाही. सगळीकडे फक्त यादी आहे - हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे.

असं कर्तव्याच्या ओझ्याखाली दाबलेलं आयुष्य जगायचं असेल तर ते नातं कसं फुलणार?

प्रत्येक पुरुषाने म्हणायला हवं,मला अशी बायको नकोय जी माझ्यासाठी फक्त कर्तव्य म्हणून जगेल. मला ती व्यक्ती हवीय जी माझ्यासोबत प्रेम म्हणून जगेल. कारण कर्तव्य संपतं, कर्तव्याला कंटाळा येतो, कर्तव्याला थकवा येतो. पण प्रेम? प्रेम रोज नवं होतं.

माझं तुझ्यावरचं प्रेम ही माझी जबाबदारी नाही, ती माझी गरज नाही, ती माझी भावना आहे. आणि मलाही तुझ्याकडून तेच हवंय. तू माझ्यासाठी कर्तव्य म्हणून थांबू नकोस, तू माझ्यासाठी प्रेम म्हणून थांब.

जेव्हा दोन माणसं कर्तव्य म्हणून एकत्र येतात तेव्हा संसार होतो, पण जेव्हा दोन माणसं भावना म्हणून एकत्र येतात तेव्हाच नातं बहरतं.

स्त्रीने कर्तव्य करावं, पण कर्तव्य बनून जगू नये. तिने माणूस म्हणून जगावं.

✍कांचन ठाकरे
2,0400014
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१८ ऑक्टो, २०२६, १९:०४

Photo1/2
नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसणं वेगळं अन् रणरणत्या उन्हात रानात राबून मातीशी झुंजणं वेगळं..पण घाम गाळून भाकरी कमावणं म्हणजे काय, हे शेतात राबणाऱ्या मायमाऊलीला विचारा. संघर्ष रंगांच्या साड्यांत नाही, तर उन्हातान्हात रापलेल्या काळजात असतो.
❤️
#सलाम #नऊरंग
1,8000027
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१८ ऑक्टो, २०२६, १९:०४

दुष्काळ आणि महागाई. ही दोन मोठ्ठी संकटे आपल्यासमोर येऊन ठेपली आहेत.

आज ज्या प्रमाणात यांच्या झळा आपल्याला लागत आहेत त्याच्या किमान ३ पट त्रास आजपासून २ महिन्यानंतर होणार आहे.

पाण्याची आणि पैशाची काटकसर करतच या संकटातून मार्ग निघू शकतो.
1,7700015
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१६ ऑक्टो, २०२६, १७:३२

Photo
श्रद्धा ही फक्त दिसण्यासाठी नसून ती मनातून जपता यावी कारण जग जरी तुम्हाला बाहेरून ओळखत असलं तरी देव आपल्याला अंतर्मनातून जाणून घेऊ शकतो!,,,✍🏻

एकमन#लेखक
https://t.me/Omsmshelke
7940020
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, १८:३८

Photo
📚 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती निम्मित वाचन प्रेरणा दिवस (Reading Inspiration Day) 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

👉 जन्मदिन: 15 ऑक्टोबर 1931

👉 उद्देश: वाचन संस्कृतीचा प्रसार करणे व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.

💐💐💐💐💐
1,140001
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, १७:३४

Photo
भारताचे 'मिसाईल मॅन'🇮🇳...(नक्की पूर्ण वाचा..✍️)

डॉ अब्दुल कलाम ह्यांनी,देशासाठी अर्पण केले स्वतःचे संपूर्ण जीवन..
त्यांचे कार्य राष्ट्रोन्नतीसाठी एवढे की शेवटच्या श्वासापर्यंत दिले समर्पण..!

गरिबीतून,बेताच्या परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी स्वतःला घडवले..
नशीबवान आपण भारतीय,त्यांच्या रुपी आपणास एक राष्ट्रपती मिळाले..!

भारताच्या संशोधन,संरक्षण,अंतराळ,शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांचे नेतृत्व..
एक महान वैज्ञानिक व 'मिसाईल मॅन' म्हणुन जगभरात त्यांचे महान कर्तुत्व..!

युवकांसाठी ते नेहमी असणार प्रेरणास्थान,कला,साहित्यातही त्यांचे मोलाचे असे योगदान..
त्यांचा राष्ट्रकार्याचा गौरव म्हणून दिला "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान,उंचावली देशानी मान..!

15 ऑक्‍टोबर ही त्यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जाते.त्यांच्या कार्याला आणि देशभक्तीला सलाम,जय हिंद..!🇮🇳
.......🦋🌺😇💞.......
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id- https://t.me/Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
1,140006
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, ११:५६

Photo
वाचन.. 🥰
“वाचनाची आवड असणारी माणसं थोडी जरी सवड मिळाली की, वाचतात आणि नवे ज्ञान प्राप्त करतात.. ”
✍️अनिल भगवान चव्हाण(ABC )
फोटो -शोध सुखाचा हे माझं पुस्तक वाचतांना प्रा. संदीप जाधव महोरा जि. जालना
15ऑक्टोबर राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
1,1800010
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, ००:५४

हॅलो मुलांनो मी जवळजवळ दोन-तीन वर्षापासून हे म्हणत आलोय की जेव्हा आपण शंभर जागा असतील तर त्यापैकी दहा टक्के जागा या आपल्या नाही. दहा टक्के जागा कोणत्या ना कोणत्या गैरप्रकाराने भरल्या जातात सगळ्या एक्झाम बॉडी मध्ये... पण आता सध्या काय झालंय काही हावऱ्या किंवा जास्त लालची माणसांमुळे ते दहा टक्क्यांचे प्रमाण 25% - 30% पर्यंत गेलेला आहे. काही काही ठिकाणी तर 50% पर्यंत गेलेले त्यामुळे हे पेपर फुटीचे प्रकरण बाहेर आले आणि आपण बघतोच आहे की त्याचे परिणाम काय होत आहेत.

आता सुद्धा आपण बघतोय की एमपीएससीने रद्दीचा टेंडर काढलेला आहे किंवा उत्तर पत्रिका नष्ट करायचं काम सुरू आहे तर हे खरंच भयानक आहे तुम्ही याचा जेवढा विचार कराल तेवढं तुम्हाला जास्त त्रास होणार आहे ही एवढी मोठी गोष्ट आहे आणि आपण काय घेऊन बसलोय जागा वाढ करा ऑब्जेक्टिव्ह करा ऑनलाईन ऑफलाइन मध्ये खेळत बसलोय ठीक आहे तर त्यांना काहीच होणार नाही जर हे असले प्रकार चालू असतील तर कधीच हे नीट होऊ शकत नाही.

आणि या सर्वातून एकच गोष्ट सिद्ध होते की ज्याच्या हातात सगळी authority आहे ना त्यांना एकदा मनापासून ठरवलं की सगळं आपल्याला नीट करायचं तर कोणीच वाईट काय करू शकत नाही थोडक्यात मला म्हणायचे की मुख्यमंत्र्यांनी ठरवलं एमपीएससीच्या अध्यक्षांनी ठरवलं की आपल्याला सगळं पारदर्शक करायचंय तरच हे शक्य आहे. नाही तर शक्य नाही तुम्ही कितीही आंदोलन करा कितीही विरोध करा हे चालूच राहणार आहे.

शेवटी चांगली गोष्ट कधी होते ज्याच्या हातात ती वाईट करायची पावर आहे त्यांनी ती पावर नाही वापरली तर ती गोष्ट चांगली होणार आहे.

त्यामुळे माझं माननीय मुख्यमंत्र्यांना एकच सांगणे की शिक्षण, आरोग्य, अन्न अशा ठिकाणी भ्रष्टाचाराला अजिबात थरा नाही दिला पाहिजे. कठोर मधली कठोर शिक्षा दिली पाहिजे पण आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला तुमची मैत्री जपायची आहे की महाराष्ट्राचं भविष्य पाहिजे हे सगळं तुमच्या हातात आहे आम्ही फक्त सांगायचं काम करतोय तुम्हाला थोड्या तरी भावना असतील किंवा विद्यार्थ्यांविषयी किंवा महाराष्ट्राच्या भविष्याविषयी काळजी असेल तर नक्कीच तुम्ही कठोर पावले उचलावीत आणि योग्य तो निर्णय घ्यावा.

असह्य... निराशा... 😔

-अभिषेक
1,4800015
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१४ ऑक्टो, २०२६, १३:२१

नवरात्री लेखमाला : दिवस तिसरा


" ती : शांतता आणि प्रहार "

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण दुर्गेचे तिसरे तेजस्वी रूप असलेल्या 'देवी चंद्रघंटा'ची आराधना करतो. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, जो मनाला शीतलता आणि अथांग शांतता देतो. पण त्याच वेळी तिच्या दहा हातांमध्ये विविध शस्त्रे तळपताना दिसतात. चंद्रघंटेचे हे रूप आपल्याला जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा समतोल शिकवते - आत मनामध्ये शांतता, संयम आणि चेहऱ्यावर सौम्यता असली, तरी गरज पडेल तेव्हा दुष्टांचा संहार करण्यासाठी हातात शस्त्र उगारण्याचे धाडस असायला हवे.

आजच्या वेगवान आणि असुरक्षित युगात चंद्रघंटेचे हे रूप प्रत्येक मुलगी आणि महिलेच्या अस्तित्वाशी थेट जोडलेले आहे.

आजची स्त्री घराचा उंबरा ओलांडून जेव्हा बाहेरच्या जगात वावरते, तेव्हा तिच्यासमोर रोज दोन पातळ्यांवर संघर्ष सुरू असतो - एक मानसिक पातळीवर आणि दुसरा शारीरिक सुरक्षिततेच्या पातळीवर. ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये किंवा प्रवासात वावरताना ती अत्यंत संयमी, हसतमुख आणि शांत दिसते. अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे डोक्यावर असतानाही ती चेहऱ्यावरचा ताण दाखवत नाही. चंद्रघंटेच्या अर्धचंद्रासारखी शीतलता आणि शांतता ती टिकवून ठेवते.

पण ही 'शांतता' म्हणजे तिची 'कमकुवतता' किंवा 'लाचारी' नव्हे, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आता आली आहे.

आजच्या समाजात मुलींना लहानपणापासूनच 'सहनशीलता' शिकवली जाते. "चार चौघांत आवाज वाढवू नको," "दुर्लक्ष कर," "वाद वाढवू नको" असे सल्ले देऊन तिला शांत राहायला भाग पाडले जाते. पण या तथाकथित शांततेचा गैरफायदा अनेकदा विकृत मनोवृत्ती घेतात. रस्त्यावरून चालताना होणारी छेडछाड असो, रात्री-अपरात्री कामावरून घरी परतताना जाणवणारी असुरक्षितता असो, किंवा ऑफिसमधील अंतर्गत राजकारण आणि होणारे मानसिक शोषण असो - अशा वेळी फक्त शांत राहून भागत नाही. तिथे चंद्रघंटेच्या हातातल्या शस्त्रासारखा थेट 'प्रहार' करावा लागतो.

हा प्रहार म्हणजे काय ? आजच्या काळात शस्त्रांचे स्वरूप बदलले आहे. आजच्या मुलीच्या हातातील शस्त्रे म्हणजे तिचे कायदेशीर ज्ञान, स्वसंरक्षणाचे कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पष्ट शब्दांत ‘नाही’ म्हणण्याची हिंमत !

कामाच्या ठिकाणी किंवा समाजात कोणत्याही मर्यादेबाहेर जाणाऱ्या गोष्टीला ठामपणे नकार देणे, पॉश कायद्यासारख्या (POSH Act) कायदेशीर अधिकारांची जाणीव ठेवणे, आणि स्वतःच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी कराटे, तायक्वांदो किंवा बेसिक सेल्फ डिफेन्सचे धडे गिरवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. तिच्या पर्समध्ये ठेवलेला पेपर स्प्रे किंवा तिच्या नजरेतील जरब, हीच तिची आधुनिक शस्त्रे आहेत.

संयम बाळगणे हा दुर्बलपणा नसतो, तो सुसंस्कृतपणा असतो. पण त्या संयमाचा गैरफायदा घेऊन कोणी सुरक्षिततेवर घाला घालत असेल, तर तिथे रणरागिणी बनून प्रतिकार करणे हा प्रत्येक स्त्रीचा धर्म आहे. जेव्हा एखाद्या मुलीच्या नजरेत अन्यायाविरुद्ध पेटलेली ठिणगी दिसते, तेव्हा समोरच्या विकृतीचे पाय आपोआप मागे सरकतात.

आजच्या स्त्रीने चंद्रघंटेसारखे दोन पदरी आयुष्य जगायला शिकले पाहिजे - घरात, कामात आणि नात्यांमध्ये गंगेसारखी शांत, पण आत्मसन्मानावर आणि सुरक्षिततेवर घाला आला तर क्षणात अग्नीसारखा भडका उडवणारी !

म्हणूनच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा करताना, मंदिरात घंटा नाद करण्यासोबतच आपल्या लेकी-बाळींच्या मनात आत्मविश्वासाची घंटा वाजू देऊया. त्यांना केवळ शांत राहण्याचे संस्कार न देता, संकटाच्या वेळी आत्मरक्षणासाठी आणि स्वतःच्या अधिकारांसाठी ठामपणे लढण्याचे बळ देऊया...!!

लेखन : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव
1,650007
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१४ ऑक्टो, २०२६, ११:१८

Photo
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... 🥰💙
1,5100010
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१२ ऑक्टो, २०२६, २१:५५

Photo
दिवस २ । नवरात्री
नवरंग नात्यांचे, भान माणुसकीचे!🤍

आपण प्रवास करताना, बाजारात किंवा रस्त्यावर अनेक अनोळखी माणसांना भेटतो. त्यांच्याशी आपलं नातं नसलं, तरी आपलं वागणं त्यांच्या अनुभवाचा भाग बनतं. गर्दीत विनाकारण स्पर्श करणं, टक लावून पाहणं, नको असताना बोलण्याचा आग्रह धरणं किंवा एखादी व्यक्ती अस्वस्थ असल्याचं दिसूनही दुर्लक्ष करणं टाळता येतं. एखाद्याला त्रास दिला जात असल्याचं दिसल्यास, परिस्थितीचा विचार करून सुरक्षितपणे मदत करता येते. गरज पडल्यास इतरांची किंवा योग्य यंत्रणेची मदत घेणंही महत्त्वाचं आहे.

भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत बंधुतेचा उल्लेख आहे. बंधुता म्हणजे केवळ एकमेकांशी चांगलं बोलणं नव्हे, तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणं आणि तिला समान माणूस म्हणून वागणूक देणं. आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीशीही आदराने वागणं, तिच्या अडचणी समजून घेणं आणि गरजेच्या वेळी मदतीसाठी पुढे येणं, यातून बंधुतेचं मूल्य आपल्या रोजच्या वागण्यात उतरू शकतं.

आपण सार्वजनिक ठिकाणी कसं वागतो, यावरही त्या जागेचा अनुभव ठरतो. आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला असुरक्षित वाटणार नाही, याची काळजी घेऊया.
1,910009

Showing 30 of 135 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ (@ghebhararitu) हा tgdio वर राजकारण श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे १८,९४५ सबस्क्राइबर आहेत.

मी ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ (@ghebhararitu) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @ghebhararitu वर मोफत सबस्क्राइब करा.

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ चांगला राजकारण चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे १८,९४५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या राजकारण चॅनेल्सशी तुलना करा.

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @ghebhararitu पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.