⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ Telegram channel photo

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

@ghebhararituPublic Channel

🎯🥇"Nothing Is Impossible फक्त जिद्द पाहिजे..!✌️💯 अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】 👇👇Join 👇👇 http://:t.me/ghebhararitu

राजकारणमराठीभारत

794

Last views

१८.९k (18,945 subscribers)
सदस्य
—
Rating
117
Total Posts
Oct 19, 2026, 2:23 PM
अपडेट केले
Oct 10, 2025
Created
Stats

तुम्ही मराठीत मजकूर पाहत आहात. इतर भाषांमधील सामग्री पाहण्यासाठी साइटची भाषा बदला.

Channel Information

Channel Information
Channel Name⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
Username@ghebhararitu
Categoryराजकारण
Languageमराठी
Countryभारत
सदस्य18,945
Channel TypePublic Channel
Created१० ऑक्टो, २०२५
Last Updated१९ ऑक्टो, २०२६ • २ दिवसांपूर्वी
StatusActive

रँकिंग

जागतिक रँकिंग
#333130-878
भाषा रँकिंग
#205+1
श्रेणी रँकिंग
#7835-2

सहभागींची वाढ

एकूण: 18.9K30 Days growth: -3321.7%
09/2009/2509/3010/0510/1010/1510/19
सहभागींची वाढ - 30 Days
DateSubscribers
20:09:202619,277
21:09:202619,277
22:09:202619,277
23:09:202619,277
24:09:202619,182
25:09:202619,182
26:09:202619,182
27:09:202619,182
28:09:202619,182
29:09:202619,182
30:09:202619,182
01:10:202619,182
02:10:202619,182
03:10:202619,182
04:10:202619,182
05:10:202619,182
06:10:202619,182
07:10:202619,182
08:10:202619,182
09:10:202619,182
10:10:202619,182
11:10:202619,011
12:10:202619,011
13:10:202619,011
14:10:202619,011
15:10:202619,011
16:10:202619,011
17:10:202619,011
18:10:202619,011
19:10:202618,945
सहभागींची वाढ - Weekly
DateSubscribers
Week of 06:04:202620,926
Week of 13:04:202620,771
Week of 20:04:202620,705
Week of 27:04:202620,705
Week of 04:05:202620,544
Week of 11:05:202620,544
Week of 18:05:202620,544
Week of 25:05:202620,358
Week of 01:06:202620,358
Week of 08:06:202620,220
Week of 15:06:202620,220
Week of 22:06:202620,110
Week of 29:06:202620,110
Week of 06:07:202620,110
Week of 13:07:202619,926
Week of 20:07:202619,827
Week of 27:07:202619,741
Week of 03:08:202619,741
Week of 10:08:202619,585
Week of 17:08:202619,585
Week of 24:08:202619,456
Week of 31:08:202619,363
Week of 07:09:202619,363
Week of 14:09:202619,277
Week of 21:09:202619,182
Week of 28:09:202619,182
Week of 05:10:202619,011
Week of 12:10:202619,011
Week of 19:10:202618,945
सहभागींची वाढ - Monthly
DateSubscribers
April 202620,705
May 202620,358
June 202620,110
July 202619,741
August 202619,456
September 202619,182
October 202618,945
सहभागींची वाढ - Yearly
DateSubscribers
202618,945

Top 10 posts

Most viewed posts from this channel

By views
  1. #1जीवनात स्वतःला स्वतः समजून घेता आलं की दुसर कोणी समजून घेणारं नसलं तरी3.1K
  2. #2वडार..3.0K
  3. #3👉🏻 योग्य दिशेने झालेली हळू प्रगती ही दिशा नसलेल्या वेगापेक्षा नक्कीच2.9K
  4. #4गुढीपाडवा... 🚩🚩2.9K
  5. #5पुढील ३ तासांत बीड,लातूर,नांदेड,परभणी, पुणे येथे काही ठिकाणी विजांच्या2.9K
  6. #6जीवनात सर्व काही आपल्या मनासारखचं होईल असं काही नाही ना राव काही गोष्ट2.7K
  7. #7पुढील ३ तासात अहिल्यानगर,बीड,धाराशिव,पुणे,सांगली,सोलापूर या जिल्ह्यात 2.7K
  8. #8प्रत्येकाचा आयुष्यात एक व्यक्ती अशी हवी की तिला आपल्या व्याहारिक आयुष्2.7K
  9. #9🔴 सगळे आहे. पुस्तके, नोट्स, मार्गदर्शन, टेस्ट सिरीज वगैरे वगैरे पण..2.6K
  10. #10👉🏻 तुम्हाला जर परिवर्तनाची भीती वाटतं असेल तर तुम्ही स्वतःला Comfort2.6K

नवीनतम पोस्ट्स

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१६ ऑक्टो, २०२६, १७:३२

Photo
श्रद्धा ही फक्त दिसण्यासाठी नसून ती मनातून जपता यावी कारण जग जरी तुम्हाला बाहेरून ओळखत असलं तरी देव आपल्याला अंतर्मनातून जाणून घेऊ शकतो!,,,✍🏻

एकमन#लेखक
https://t.me/Omsmshelke
7940020
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, १८:३८

Photo
📚 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती निम्मित वाचन प्रेरणा दिवस (Reading Inspiration Day) 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

👉 जन्मदिन: 15 ऑक्टोबर 1931

👉 उद्देश: वाचन संस्कृतीचा प्रसार करणे व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.

💐💐💐💐💐
1,140001
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, १७:३४

Photo
भारताचे 'मिसाईल मॅन'🇮🇳...(नक्की पूर्ण वाचा..✍️)

डॉ अब्दुल कलाम ह्यांनी,देशासाठी अर्पण केले स्वतःचे संपूर्ण जीवन..
त्यांचे कार्य राष्ट्रोन्नतीसाठी एवढे की शेवटच्या श्वासापर्यंत दिले समर्पण..!

गरिबीतून,बेताच्या परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी स्वतःला घडवले..
नशीबवान आपण भारतीय,त्यांच्या रुपी आपणास एक राष्ट्रपती मिळाले..!

भारताच्या संशोधन,संरक्षण,अंतराळ,शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांचे नेतृत्व..
एक महान वैज्ञानिक व 'मिसाईल मॅन' म्हणुन जगभरात त्यांचे महान कर्तुत्व..!

युवकांसाठी ते नेहमी असणार प्रेरणास्थान,कला,साहित्यातही त्यांचे मोलाचे असे योगदान..
त्यांचा राष्ट्रकार्याचा गौरव म्हणून दिला "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान,उंचावली देशानी मान..!

15 ऑक्‍टोबर ही त्यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जाते.त्यांच्या कार्याला आणि देशभक्तीला सलाम,जय हिंद..!🇮🇳
.......🦋🌺😇💞.......
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id- https://t.me/Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
1,140006
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, ११:५६

Photo
वाचन.. 🥰
“वाचनाची आवड असणारी माणसं थोडी जरी सवड मिळाली की, वाचतात आणि नवे ज्ञान प्राप्त करतात.. ”
✍️अनिल भगवान चव्हाण(ABC )
फोटो -शोध सुखाचा हे माझं पुस्तक वाचतांना प्रा. संदीप जाधव महोरा जि. जालना
15ऑक्टोबर राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
1,1800010
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१५ ऑक्टो, २०२६, ००:५४

हॅलो मुलांनो मी जवळजवळ दोन-तीन वर्षापासून हे म्हणत आलोय की जेव्हा आपण शंभर जागा असतील तर त्यापैकी दहा टक्के जागा या आपल्या नाही. दहा टक्के जागा कोणत्या ना कोणत्या गैरप्रकाराने भरल्या जातात सगळ्या एक्झाम बॉडी मध्ये... पण आता सध्या काय झालंय काही हावऱ्या किंवा जास्त लालची माणसांमुळे ते दहा टक्क्यांचे प्रमाण 25% - 30% पर्यंत गेलेला आहे. काही काही ठिकाणी तर 50% पर्यंत गेलेले त्यामुळे हे पेपर फुटीचे प्रकरण बाहेर आले आणि आपण बघतोच आहे की त्याचे परिणाम काय होत आहेत.

आता सुद्धा आपण बघतोय की एमपीएससीने रद्दीचा टेंडर काढलेला आहे किंवा उत्तर पत्रिका नष्ट करायचं काम सुरू आहे तर हे खरंच भयानक आहे तुम्ही याचा जेवढा विचार कराल तेवढं तुम्हाला जास्त त्रास होणार आहे ही एवढी मोठी गोष्ट आहे आणि आपण काय घेऊन बसलोय जागा वाढ करा ऑब्जेक्टिव्ह करा ऑनलाईन ऑफलाइन मध्ये खेळत बसलोय ठीक आहे तर त्यांना काहीच होणार नाही जर हे असले प्रकार चालू असतील तर कधीच हे नीट होऊ शकत नाही.

आणि या सर्वातून एकच गोष्ट सिद्ध होते की ज्याच्या हातात सगळी authority आहे ना त्यांना एकदा मनापासून ठरवलं की सगळं आपल्याला नीट करायचं तर कोणीच वाईट काय करू शकत नाही थोडक्यात मला म्हणायचे की मुख्यमंत्र्यांनी ठरवलं एमपीएससीच्या अध्यक्षांनी ठरवलं की आपल्याला सगळं पारदर्शक करायचंय तरच हे शक्य आहे. नाही तर शक्य नाही तुम्ही कितीही आंदोलन करा कितीही विरोध करा हे चालूच राहणार आहे.

शेवटी चांगली गोष्ट कधी होते ज्याच्या हातात ती वाईट करायची पावर आहे त्यांनी ती पावर नाही वापरली तर ती गोष्ट चांगली होणार आहे.

त्यामुळे माझं माननीय मुख्यमंत्र्यांना एकच सांगणे की शिक्षण, आरोग्य, अन्न अशा ठिकाणी भ्रष्टाचाराला अजिबात थरा नाही दिला पाहिजे. कठोर मधली कठोर शिक्षा दिली पाहिजे पण आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला तुमची मैत्री जपायची आहे की महाराष्ट्राचं भविष्य पाहिजे हे सगळं तुमच्या हातात आहे आम्ही फक्त सांगायचं काम करतोय तुम्हाला थोड्या तरी भावना असतील किंवा विद्यार्थ्यांविषयी किंवा महाराष्ट्राच्या भविष्याविषयी काळजी असेल तर नक्कीच तुम्ही कठोर पावले उचलावीत आणि योग्य तो निर्णय घ्यावा.

असह्य... निराशा... 😔

-अभिषेक
1,4800015
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१४ ऑक्टो, २०२६, १३:२१

नवरात्री लेखमाला : दिवस तिसरा


" ती : शांतता आणि प्रहार "

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण दुर्गेचे तिसरे तेजस्वी रूप असलेल्या 'देवी चंद्रघंटा'ची आराधना करतो. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, जो मनाला शीतलता आणि अथांग शांतता देतो. पण त्याच वेळी तिच्या दहा हातांमध्ये विविध शस्त्रे तळपताना दिसतात. चंद्रघंटेचे हे रूप आपल्याला जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा समतोल शिकवते - आत मनामध्ये शांतता, संयम आणि चेहऱ्यावर सौम्यता असली, तरी गरज पडेल तेव्हा दुष्टांचा संहार करण्यासाठी हातात शस्त्र उगारण्याचे धाडस असायला हवे.

आजच्या वेगवान आणि असुरक्षित युगात चंद्रघंटेचे हे रूप प्रत्येक मुलगी आणि महिलेच्या अस्तित्वाशी थेट जोडलेले आहे.

आजची स्त्री घराचा उंबरा ओलांडून जेव्हा बाहेरच्या जगात वावरते, तेव्हा तिच्यासमोर रोज दोन पातळ्यांवर संघर्ष सुरू असतो - एक मानसिक पातळीवर आणि दुसरा शारीरिक सुरक्षिततेच्या पातळीवर. ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये किंवा प्रवासात वावरताना ती अत्यंत संयमी, हसतमुख आणि शांत दिसते. अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे डोक्यावर असतानाही ती चेहऱ्यावरचा ताण दाखवत नाही. चंद्रघंटेच्या अर्धचंद्रासारखी शीतलता आणि शांतता ती टिकवून ठेवते.

पण ही 'शांतता' म्हणजे तिची 'कमकुवतता' किंवा 'लाचारी' नव्हे, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आता आली आहे.

आजच्या समाजात मुलींना लहानपणापासूनच 'सहनशीलता' शिकवली जाते. "चार चौघांत आवाज वाढवू नको," "दुर्लक्ष कर," "वाद वाढवू नको" असे सल्ले देऊन तिला शांत राहायला भाग पाडले जाते. पण या तथाकथित शांततेचा गैरफायदा अनेकदा विकृत मनोवृत्ती घेतात. रस्त्यावरून चालताना होणारी छेडछाड असो, रात्री-अपरात्री कामावरून घरी परतताना जाणवणारी असुरक्षितता असो, किंवा ऑफिसमधील अंतर्गत राजकारण आणि होणारे मानसिक शोषण असो - अशा वेळी फक्त शांत राहून भागत नाही. तिथे चंद्रघंटेच्या हातातल्या शस्त्रासारखा थेट 'प्रहार' करावा लागतो.

हा प्रहार म्हणजे काय ? आजच्या काळात शस्त्रांचे स्वरूप बदलले आहे. आजच्या मुलीच्या हातातील शस्त्रे म्हणजे तिचे कायदेशीर ज्ञान, स्वसंरक्षणाचे कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पष्ट शब्दांत ‘नाही’ म्हणण्याची हिंमत !

कामाच्या ठिकाणी किंवा समाजात कोणत्याही मर्यादेबाहेर जाणाऱ्या गोष्टीला ठामपणे नकार देणे, पॉश कायद्यासारख्या (POSH Act) कायदेशीर अधिकारांची जाणीव ठेवणे, आणि स्वतःच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी कराटे, तायक्वांदो किंवा बेसिक सेल्फ डिफेन्सचे धडे गिरवणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. तिच्या पर्समध्ये ठेवलेला पेपर स्प्रे किंवा तिच्या नजरेतील जरब, हीच तिची आधुनिक शस्त्रे आहेत.

संयम बाळगणे हा दुर्बलपणा नसतो, तो सुसंस्कृतपणा असतो. पण त्या संयमाचा गैरफायदा घेऊन कोणी सुरक्षिततेवर घाला घालत असेल, तर तिथे रणरागिणी बनून प्रतिकार करणे हा प्रत्येक स्त्रीचा धर्म आहे. जेव्हा एखाद्या मुलीच्या नजरेत अन्यायाविरुद्ध पेटलेली ठिणगी दिसते, तेव्हा समोरच्या विकृतीचे पाय आपोआप मागे सरकतात.

आजच्या स्त्रीने चंद्रघंटेसारखे दोन पदरी आयुष्य जगायला शिकले पाहिजे - घरात, कामात आणि नात्यांमध्ये गंगेसारखी शांत, पण आत्मसन्मानावर आणि सुरक्षिततेवर घाला आला तर क्षणात अग्नीसारखा भडका उडवणारी !

म्हणूनच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा करताना, मंदिरात घंटा नाद करण्यासोबतच आपल्या लेकी-बाळींच्या मनात आत्मविश्वासाची घंटा वाजू देऊया. त्यांना केवळ शांत राहण्याचे संस्कार न देता, संकटाच्या वेळी आत्मरक्षणासाठी आणि स्वतःच्या अधिकारांसाठी ठामपणे लढण्याचे बळ देऊया...!!

लेखन : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव
1,650007
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१४ ऑक्टो, २०२६, ११:१८

Photo
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... 🥰💙
1,5100010
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१२ ऑक्टो, २०२६, २१:५५

Photo
दिवस २ । नवरात्री
नवरंग नात्यांचे, भान माणुसकीचे!🤍

आपण प्रवास करताना, बाजारात किंवा रस्त्यावर अनेक अनोळखी माणसांना भेटतो. त्यांच्याशी आपलं नातं नसलं, तरी आपलं वागणं त्यांच्या अनुभवाचा भाग बनतं. गर्दीत विनाकारण स्पर्श करणं, टक लावून पाहणं, नको असताना बोलण्याचा आग्रह धरणं किंवा एखादी व्यक्ती अस्वस्थ असल्याचं दिसूनही दुर्लक्ष करणं टाळता येतं. एखाद्याला त्रास दिला जात असल्याचं दिसल्यास, परिस्थितीचा विचार करून सुरक्षितपणे मदत करता येते. गरज पडल्यास इतरांची किंवा योग्य यंत्रणेची मदत घेणंही महत्त्वाचं आहे.

भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत बंधुतेचा उल्लेख आहे. बंधुता म्हणजे केवळ एकमेकांशी चांगलं बोलणं नव्हे, तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणं आणि तिला समान माणूस म्हणून वागणूक देणं. आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीशीही आदराने वागणं, तिच्या अडचणी समजून घेणं आणि गरजेच्या वेळी मदतीसाठी पुढे येणं, यातून बंधुतेचं मूल्य आपल्या रोजच्या वागण्यात उतरू शकतं.

आपण सार्वजनिक ठिकाणी कसं वागतो, यावरही त्या जागेचा अनुभव ठरतो. आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला असुरक्षित वाटणार नाही, याची काळजी घेऊया.
1,910009
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१२ ऑक्टो, २०२६, २१:५५

स्त्रीवर होणारा अन्याय आणि शोषण पाहून
गप्प बसणारा समाज,
आता नवरात्रीत स्त्रीशक्तीची आराधना करणार.

मग प्रश्न एवढाच आहे - देवी म्हणून पूजायचंय, 
की माणूस म्हणून जगू द्यायचं?

आरतीच्या ताटात स्त्रीशक्तीची पूजा करण्याआधी,
तिच्या जगण्याच्या हक्कासाठी उभं राहण्याची हिंमत आहे का?
1,710008
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१२ ऑक्टो, २०२६, ०३:०७

शेवटी सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय आज झाले... उदया पासून छान पद्धतीने अभ्यासाला लागा शुभेच्छा. 💯 💐💐❣️
1,990002
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

"आम्ही निष्पाप, बदनामी थांबवा!"; MPSC कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन, सुरक्षेची हमी मिळेपर्यंत भरती प्रक्रिया ठप्प? पत्र व्हायरल..
👇👇👇
https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-secretary-mahendra-harpalkar-assault-staff-strike-maharashtra-lokseva-aayog/articleshow/134082246.cms
1,410000
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

Photo
बरेच विद्यार्थी असहमत असतील, पण मी अशा घटनेचे समर्थन नाही करू शकत.
आपला लढा खराब व्यवस्थेविरुद्ध आहे, त्याला व्यक्ती विरुद्ध बनू नका देऊ.
वैयक्तिक अपमानाने काहीच साध्य होणार नाही.
अध्यक्ष आणि सचिव यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे हे मत माझे आजही आहे.
पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही.
निषेध.
1,6300014
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

Photo
स्वतः ला ओळखण्याची एक सुंदर कला ‘ध्यान’ नक्की वाचा हा लेख..
1,590004
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

Video
बैलपोळाच्या कुणबी शेतकरी बांधवाना शुभेच्छा...!
प्राचीन मानवांनी हस्तश्रमाचे संबंध नंतर शेती मध्ये पशुश्रमाचा वापर केल्याने कृषी उत्पादन प्रचंड वाढले व समाज अधिक संपन्न होत गेला. पशुपालन आणि कृषी एकत्रित येणे ही मानवी संस्कृतीची पहिली क्रांति होती. याचे ऋण मान्य करणारा सण म्हणजेच बैल पोळा....❤️
1,6300011
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

“त्या " अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला विनम्र अभिवादन...🙏🏻🪔
आणि त्या स्वप्नामागील वेदना समजून घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न...
-----------------

करपलेल्या शेतातून उगवलेले स्वप्न...

महाराष्ट्राच्या मातीत अनेक स्वप्ने रुजतात. कुणाच्या शेतात ज्वारी उगवते, कुणाच्या अंगणात कष्टाचे संस्कार; आणि याच मातीतून एखादा तरुण अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन उभा राहतो. गावच्या मातीतून शहराच्या स्पर्धेच्या विश्वात आलेल्या या तरुणाच्या डोळ्यांत केवळ स्वतःचे भविष्य नसते. आई-वडिलांच्या कष्टांना अर्थ मिळावा, घरची परिस्थिती बदलावी आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल व्हावे, अशी अनेक स्वप्ने त्याच्यासोबत चालत असतात.

मात्र काही वेळा परिस्थिती स्वप्नांपेक्षा अधिक कठोर असते. ग्रामीण भागातील दुष्काळ हा केवळ पावसाचा अभाव नसतो. तो शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा, कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा आणि पुढच्या पिढीच्या आशेचा प्रश्न असतो. पिके करपली की केवळ शेत रिकामे होत नाही; घरातील आर्थिक गणितही कोलमडते. अशा परिस्थितीत एखादा ग्रामीण तरुण MPSC ची तयारी करत असेल, तर त्याच्या पुस्तकांमागे आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि अपूर्ण राहिलेल्या गरजा असतात. तरीही तो अभ्यास करतो. कारण त्याला विश्वास असतो की एक दिवस ही परीक्षा त्याच्या आयुष्याला नवी दिशा देईल.

पण स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा नसतो. अनेक वर्षांचा अभ्यास, सततची अनिश्चितता, आर्थिक अडचणी, परीक्षांचे वेळापत्रक, निकालाची प्रतीक्षा आणि अपयशाची भीती, या सगळ्यांशी विद्यार्थ्याला एकाच वेळी सामना करावा लागतो. त्यातच परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार किंवा पेपरफुटीच्या बातम्या समोर आल्या की प्रश्न केवळ परीक्षेचा राहत नाही; तो विश्वासाचा होतो.

“मी दिवसरात्र जीव तोडून अभ्यास करतोय; पण माझ्या मेहनतीला खरंच न्याय मिळणार आहे का?” हा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होणे हीच व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे. पेपरफुटीचा सर्वात मोठा परिणाम प्रश्नपत्रिकेवर होत नाही; तो विद्यार्थ्याच्या विश्वासावर होतो, त्याच्या मानसिकतेवर होतो. एका बाजूला ग्रामीण कुटुंब आर्थिक संकटाशी झुंजत असते, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा आपल्या भवितव्यासाठी दिवस-रात्र पुस्तकांशी झुंजत असतो. अशा वेळी परीक्षा व्यवस्थेतील एका गैरप्रकाराची बातमी त्याच्या मनातील अनेक प्रश्नांना जन्म देऊ शकते. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याच्या दुःखद मृत्यूकडे केवळ वैयक्तिक अपयश या दृष्टीने पाहणे योग्य ठरणार नाही. त्याच्यावर ही वेळ का आली याचासुद्धा गांभीर्याने विचार व्हायला हवा. दुष्काळ, आर्थिक विवंचना, स्पर्धेचा ताण आणि परीक्षा व्यवस्थेवरील अविश्वास यांसारख्या घटकांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रश्न असा आहे की, आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून फक्त संघर्षाची अपेक्षा करणार आहोत की त्यांच्या संघर्षात व्यवस्थाही त्यांच्या सोबत उभी राहणार आहे?

शासनाने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक मजबूत केले पाहिजे. गैरप्रकारांच्या तक्रारींवर तातडीने आणि विश्वासार्ह चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि आधारव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. कारण MPSC ही केवळ एक परीक्षा नाही. ती महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांच्या आशेची वाट आहे. त्या वाटेवर चालणारा विद्यार्थी जेव्हा पुस्तक उघडतो, तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांची स्वप्नेही उघडली जातात. शेतात पिके करपली तरी पुढच्या पावसाची आशा शेतकरी धरून ठेवतो. तशीच आशा विद्यार्थ्याच्या मनातही जिवंत राहिली पाहिजे. व्यवस्थेने विद्यार्थ्याला निष्पक्ष संधीची हमी देणे तिचे कर्तव्य आहे.

एका विद्यार्थ्याच्या दुःखद अंताची केवळ हळहळ व्यक्त करून ही घटना संपता कामा नये. त्याच्या स्वप्नामागील दुष्काळ, त्याच्या संघर्षामागील वेदना, आर्थिक विवंचना आणि त्याच्या मनातील व्यवस्थेविषयीचा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. कारण करपलेल्या शेतातूनही स्वप्न उगवू शकते; फक्त त्या स्वप्नाला जगण्याची, लढण्याची आणि पुढे जाण्याची निष्पक्ष संधी देणारी व्यवस्था हवी. मातीतून उगवलेल्या या स्वप्नांना परिस्थितीच्या उन्हात कोमेजू न देता, त्यांना आशेच्या पावसाने बहरण्याची संधी देणे ही समाजाची आणि व्यवस्थेची जबाबदारी आहे. कारण एखाद्या गरीब घरातील विद्यार्थ्याच्या हातातून पुस्तक निसटते, तेव्हा केवळ एक पुस्तक बंद होत नाही—तर एका तरुणाचे स्वप्न, एका घराची आशा आणि एका पिढीचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळतो. म्हणून आता गरज आहे ती केवळ संवेदना व्यक्त करण्याची नाही, तर अशी व्यवस्था उभी करण्याची, जिथे परिस्थिती गरीब असली तरी संधी गरीब नसेल; जिथे शेत करपले तरी स्वप्ने करपू नयेत...

--अमोलप्रतिभा...
1,740003
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

Photo
✅⚠️⚠️⚠️Alert ⏰⏰

♦️सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅📱📱

👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.

Be Aware from cyber Fraud .🙏🙏
1,970001
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

Photo
हे मान्य केलं की रुतुजा अमृत पाटीलने पेपर फोडून 155/200 गुण मिळवले, पण
रुतुजा अमृत पाटीलला साधी चार वाक्ये इंग्रजीत लिहिता येत नसतील, तर मुलाखतीत 24/50 गुण कसे मिळाले?
सर्व परीक्षांना मराठी-इंग्रजी आवश्यक असताना, #DrugInspector सारख्या पदासाठी ती थेट राजपत्रित अधिकारी कशी?
#MPSC
1,690003
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

१३ सप्टें, २०२६, १९:५६

Photo
आज परिस्थिती कठीण आहे म्हणून काय झालं?
उद्याची परिस्थिती बदलण्याची ताकद आजच्या संघर्षातच असते.
🔥 संघर्ष सुरू आहे… विजय अजून बाकी आहे!
1,9400016
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

०३ सप्टें, २०२६, २२:३२

आयोगाने जो डिसेंबर 2025 मध्ये पाचवा पर्याय चा निर्णय आनला होता कारण आयोगाच्या काही लोकांना हे माहित झाले होते की आपल्याच MPSC कार्यालयात याचा दुरूपयोग होत होता तो दुरूपयोग असा की पेपर फोडणारा विद्यार्थी त्याचा 80% पेपर रिकामा सोडवून पाठवायचा व आयोगाच्या कार्यालयात किंवा कुठे तरी तो गोल केला जायचा हे खरं आहे म्हणून आयोगाने 5 पर्याय चा नवीन GR काढला.

हा जो गलांडे आहे अप्पर सचिव तो असे Hall ticket तयार करायचा की त्याने ज्या ज्या विद्यार्थीकडून पैसे घेतले ते एकाच वर्गात किंवा जवळ पास येतील असे Hall ticket तयार करायचा कारण प्रत्येक वर त्याचीच सही होती. हा सर्वाना का जवळ बसवायचा कारण त्या कार्यालयात किंवा जिथं गोल केले जायच तिथे लवकर सर्व पैसे घेतलेले विद्यार्थी चे पेपर एकद लवकर सापडतील व तो तीथ गोल करायचा ही Moras oprendi तो वापरायचा. हीच moras operendi त्याने SR 2025 पदांना वापरली एकाच वर्गात 12 जण जे selecte झाले ते असे झाले.


- Copied
1,5400021
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

०३ सप्टें, २०२६, २२:३२

Photo
जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न करतो तोच समाधाने राहू शकतो कारण त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की प्रभू श्री रामाला पण वनवास स्वीकारावा लागला तर मग आपण साधी माणसं ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
https://t.me/Ommshelke
1,6500016
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ logo
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

०३ सप्टें, २०२६, २२:३२

Photo
❤️ दोन चिमुकल्या जीवांसाठी… तुमची छोटीशी मदत त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरू शकते..! 🙏

हृदय अक्षय डेरेकर आणि गार्गी संदीप जाधव यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे....

जमेल तितकी मदत करा आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.... 🙏❤️
1,8200010

Showing 30 of 117 posts

रेटिंग

लॉगिन आवश्यक आहे

Frequently Asked Questions

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ टेलिग्राम चॅनेल कशाबद्दल आहे?+

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ (@ghebhararitu) हा tgdio वर राजकारण श्रेणीत सूचीबद्ध टेलिग्राम चॅनेल आहे. रँकिंग, रेटिंग, रिव्ह्यू आणि अलीकडील पोस्ट पाहून सबस्क्राइब करण्यापूर्वी निर्णय घ्या. सध्या tgdio वर सुमारे १८,९४५ सबस्क्राइबर आहेत.

मी ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ (@ghebhararitu) ला टेलिग्रामवर कसे जॉइन करू?+

tgdio वर चॅनेल प्रोफाइल उघडा, नंतर Join / Open in Telegram ने @ghebhararitu वर मोफत सबस्क्राइब करा.

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ चांगला राजकारण चॅनेल आहे का?+

tgdio वर जॉइन करण्यापूर्वी ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ ची रेटिंग, रिव्ह्यू, रँकिंग आणि पोस्ट तपासा. सध्या tgdio वर सुमारे १८,९४५ सबस्क्राइबर आहेत. सारख्या राजकारण चॅनेल्सशी तुलना करा.

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ चे स्टॅट्स आणि पोस्ट कुठे बघावे?+

tgdio वर @ghebhararitu पेज उघडा — सबस्क्राइबर स्टॅट्स, रँकिंग, रेटिंग आणि पोस्ट. Stats लिंकने ग्रोथ चार्ट पहा.